Sun, March 26, 2023

आजोबाकडून नातीचा विनयभंग
आजोबाकडून नातीचा विनयभंग
Published on : 10 February 2023, 2:57 am
इंदापूर, ता. १० : इंदापूर तालुक्यातील बाभूळगाव येथे नात्याला काळिमा फासणारी घटना घडली असून, एका आजोबाने आपल्या १० वर्षीय नातीचा विनयभंग केल्याची तक्रार दाखल झाली आहे. या प्रकरणी मुलीच्या आईच्या तक्रारीवरून इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा इंदापूर शहरासह संपूर्ण तालुक्यात तीव्र निषेध व्यक्त होत आहे.