इंदापूर शहरातील रस्ता मुदतीपूर्वी उखडला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंदापूर शहरातील रस्ता मुदतीपूर्वी उखडला
इंदापूर शहरातील रस्ता मुदतीपूर्वी उखडला

इंदापूर शहरातील रस्ता मुदतीपूर्वी उखडला

sakal_logo
By

इंदापूर ता.२० : इंदापूर शहराच्या कसबा परिसरातील इंद्रेश्वर मंदिर ते कुंभारवाडा दरम्यान सिमेंट काँक्रिटचा रस्ता बनविण्यात आला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाने नगरपरिषद हद्दीत मनमानी पद्धतीने वर्षभरापूर्वी बनविलेला हा रस्ता काही महिन्यांतच उखडला आहे. त्यामुळे या रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे.
रस्त्याच्या गुणवत्तेची चौकशी होऊन शासनाची फसवणूक आणि जनतेचा पैसा मातीत घालणाऱ्या संबंधित ठेकेदार, पर्यवेक्षकिय अधिकारी आणि एकूणच दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी समीर सिराजुद्दीन सय्यद यांनी इंदापूर नगरपरिषदेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सदर परिसराच्या भौगोलिक परिस्थितीला, आणि गटारींच्या समस्येला नजर अंदाज करत नागरिकांच्या विरोधानंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदाराने नियमबाह्य व मनमानी पद्धतीने रस्ता बनविला. तसेच पूर्वीचा रस्ता खोदण्यात यावा. या नागरिकांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करून जाणूनबुजून रस्त्याची उंची वाढविण्यात आली. परिणामी पावसाचे आणि गटारीचे दुर्गंधीयुक्त पाणी नागरिकांच्या घरात शिरत आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासही अडचण येत आहे. तसेच माताड सिमेंटच्या उडणाऱ्या धुळीने नागरिक हैराण झाले आहेत. सबंध परिसरातील नागरिकांना नळाचे कनेक्शन घेणे, जुने कनेक्शन दुरुस्त करणेही आता मुश्किल झाले आहे, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.

माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे लक्ष घालणार का?
या रस्त्याच्या दर्जाबाबत गुणवत्तेची चौकशी करण्याचे तसेच दोषींवर कारवाई करण्याची मागणी माजी राज्यमंत्री, आ. दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली आहे. संबंधित कामाबाबत चौकशीचे आदेश देऊ, असा शब्द भरणे यांनी दिला आहे. यामुळे रस्त्याच्या गुणवत्तेची चौकशी होणे, दोषींवर गुन्हे दाखल होणे गरजेचे आहे, अशी मागणी तक्रारकर्ते समीर सय्यद यांनी दिली.