शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याची मिरवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याची मिरवणूक
शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याची मिरवणूक

शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याची मिरवणूक

sakal_logo
By

इंदापूर, ता.२० : येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याची पारंपरिक वाद्यांच्या गजरात भव्य मिरवणूक काढली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष इंदापूरच्या शिवजयंतीचे प्रणेते माजी नगराध्यक्ष दिवंगत रत्नाकर मखरे यांच्या प्रेरणेने शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रेय भरणे, नगराध्यक्ष अंकिता शहा, मुकुंद शहा, शकुंतला रत्नाकर मखरे, ॲड. राहुल मखरे यांनी जेतवन बुद्धविहारात तथागत गौतम बुद्ध मूर्तीस पुष्प, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत सामूहिक पंचशील त्रिशरण घेण्यात आले. त्यानंतर शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मानवंदना देत मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. यावेळी विठ्ठलराव ननवरे, गणेश महाजन, अरविंद वाघ, बाळासाहेब ढवळे, बाबजी भोंग, अविनाश कोथमिरे, ॲड. समीर टिळेकर, शकीलभाई सय्यद, राहुल गुंडेकर, माऊली नाचण, हरिदास हराळे आदी मान्यवर उपस्थित होते.

मिरवणूक नगरपालिका मैदानात दाखल झाल्यानंतर बारामतीचे माजी नगराध्यक्ष कैलास चव्हाण, भारत अहिवळे, बळीकाका बोंगाणे, बाळासाहेब वाघमारे, लालासाहेब कांबळे (पुणे) यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले. यानंतर नियोजित विद्रोही शिवभिमशाहिर शिवाजी कांबळे यांचा शाहिरी जलसा पार पडला.

कार्यक्रमाचे नियोजन ॲड. समीर मखरे, गोरख तिकोटे, संजय कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन नानासाहेब सानप यांनी तर आभार नानासाहेब चव्हाण यांनी मानले.

03115