अक्षयने पटकविला वेगवान बेसबॉल पिचरचा बहुमान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अक्षयने पटकविला वेगवान बेसबॉल पिचरचा बहुमान
अक्षयने पटकविला वेगवान बेसबॉल पिचरचा बहुमान

अक्षयने पटकविला वेगवान बेसबॉल पिचरचा बहुमान

sakal_logo
By

इंदापूर, ता.२२ : अखिल भारतीय अंतर विद्यापीठ बेसबॉल स्पर्धेत इंदापूर येथील अक्षय बाळासाहेब मोरे याने स्पर्धेतील देशात उत्कृष्ट वेगवान बेसबॉल पिचर हा पुरस्कार पटकावला. ही स्पर्धा गुवाहाटी (आसाम) येथील रॉयल ग्लोबल युनिव्हर्सिटीमध्ये १४ ते १८ फेब्रुवारी दरम्यान पार पडली. यात अक्षयने नवा विक्रम प्रस्थापित करून बहुमान संपादन केला आहे. या

अक्षय हा ग्रामीण भागातील खेळाडू असून त्यांच्या घरी कोणतीही बेसबॉल खेळण्याची परंपरा नाही. जिद्द, कष्ट, व सरावाच्या बळावर अक्षयने मिळवलेले यश लक्षवेधी ठरले. अक्षय हा पंजाब राज्यातील लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी संचलित कृषी महाविद्यालयात प्रथम वर्गात शिकत आहे. त्याने विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करत एकूण चार सामन्यात उत्कृष्ट पिचिंग केले. लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचा अंतिम सामना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघाशी झाला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात अक्षय मोरे याने चांगले पिचिंग केले. मात्र त्यांच्या संघास २-० असा पराभव पत्करावा लागला. मात्र या सामन्यात त्याने ९१ मैल प्रतीतास वेगाने पिचिंग करून देशातील सर्वात वेगवान बेसबॉल पिचर असा त्याने नवा विक्रम प्रस्थापित केला.

अक्षयला प्रशिक्षक राकेशकुमार, विष्णू कारेल, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे स्वप्नील गलांडे व विक्रम गलांडे यांचे मार्गदर्शन लाभले. तो इंदापूर येथील मोरे कृषी उद्योग समूहाचे संस्थापक कै. तुकाराम मोरे यांचा नातू तर इंदापूर अर्बन सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब मोरे यांचा चिरंजीव आहे. या यशाबद्दल अक्षय मोरे यांचे आमदार दत्तात्रेय भरणे, माजीमंत्री हर्षवर्धन पाटील, जिल्हा बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे, पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, पंचायत समितीचे माजी सभापती अंकुश पाडूळे, कर्मयोगी कारखान्याचे माजी संचालक वामनराव सरडे, इंदापूर ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष नंदकुमार गुजर यांनी अभिनंदन केले.
-
03144