Mon, March 27, 2023

इंदापूर तालुक्यात
मुलीवर बलात्कार
इंदापूर तालुक्यात मुलीवर बलात्कार
Published on : 22 February 2023, 3:22 am
इंदापूर, ता. २२ : इंदापूर तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना घडली आहे. याबाबत आरोपीला अटक केली आहे.
सोमवार (ता. २०) सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान घरात कोणी नसल्याचा फायदा घेत मुलीच्या राहत्या घरात तिच्यावर बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी एका ४८ वर्षीय आरोपीला अटक केली आहे. या संदर्भात मुलीच्या आईने मंगळवारी (ता. २१) इंदापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे हे करीत आहेत.