तालुक्यातील माळवाडी येथे आज विविधकामांचे भूमिपूजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तालुक्यातील माळवाडी येथे आज विविधकामांचे भूमिपूजन
तालुक्यातील माळवाडी येथे आज विविधकामांचे भूमिपूजन

तालुक्यातील माळवाडी येथे आज विविधकामांचे भूमिपूजन

sakal_logo
By

इंदापूर, ता. २३ : माळवाडी (ता. इंदापूर) येथे शुक्रवारी (ता. २४) दुपारी खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते व माजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली ३१ कोटी ६६ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब व्यवहारे यांनी दिली.
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, कार्याध्यक्ष अतुल झगडे उपस्थित राहणार आहेत. यावेळी माळवाडी येथे नळ पाणीपुरवठा योजना, माळवाडी ते पेटकर वस्ती रस्ता डांबरीकरण, माळवाडी नंबर दोन ते रासकर वस्ती रस्ता, जुना शहा रोड ते राऊत वस्ती रस्ता, माळवाडी नंबर २ येथे दलित वस्ती बंदिस्त गटार योजना, ज्ञानदेव गार्डे दुकान ते ढावरे वस्ती सिमेंट रस्ता, राऊतवाडी गायकवाड वस्ती इजगुडे वस्ती बेंदवस्ती माळेवाडी ते इंदापूर रस्ता या कामांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. तसेच, नवनियुक्त सरपंच मंगलताई बाळासाहेब व्यवहारे, उपसरपंच वनिता भास्कर मदने यांच्यासह नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे, असे महादेव व्यवहारे व दीपक रायकर यांनी सांगितले.