Wed, March 29, 2023

इंदापूर नगरपरिषदेच्या
मागील झाडीला आग
इंदापूर नगरपरिषदेच्या मागील झाडीला आग
Published on : 14 March 2023, 4:51 am
इंदापूर, ता. १४ : इंदापूर शहरातील प्रशासकीय इमारतीशेजारी बांधण्यात येत असलेल्या नवीन नगरपरिषद इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या झाडीला मंगळवारी (ता. १४) रात्री साडेनऊच्या दरम्यान अचानक आग लागली. सुदैवाने यामध्ये कसलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, त्या ठिकाणी असलेले निलगिरीच्या झाडे जळाल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे. दरम्यान अग्निशामक यंत्रणेच्या साह्याने आग आटोक्यात आणण्यात यंत्रणेला यश आले. मात्र, आग कोणत्या कारणाने लागली हे समजू शकले नाही.