इंदापुरात जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी शिवाजीराव मखरे इंदापूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंदापुरात जयंती उत्सव समितीच्या
अध्यक्षपदी शिवाजीराव मखरे 
इंदापूर
इंदापुरात जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी शिवाजीराव मखरे इंदापूर

इंदापुरात जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी शिवाजीराव मखरे इंदापूर

sakal_logo
By

इंदापूर, ता. २३ : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी पुणे जिल्हा रिपब्लिकन पक्षाचे (आठवले) कार्याध्यक्ष शिवाजीराव मखरे; तर युवक अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते आनंद मखरे यांची एकमताने निवड करण्यात आली.
इंदापूर शहरातील जेतवन बुद्धविहारात जयंती उत्सव कमिटीचा मागील वर्षीचा अहवाल सादर करण्यासाठी शहरातील मान्यवरांच्या उपस्थितीत व इंदापूर नगरपालिकेचे आरोग्य निरिक्षक बापू मखरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी नवीन पदाधिकारी निवड करण्यात आली. यामधे कार्याध्यक्षपदी समीर लोंढे, सहकार्याध्यक्षपदी यशपाल मखरे, सचिवपदी शुभम मखरे, सहसचिवपदी सुनील शेळके, खजिनदारपदी सुहास मखरे, सहखजिनदारपदी अजय कांबळे; तर उपाध्यक्षपदी अनिकेत खरात, शंकर मखरे यांची निवड करण्यात आली. यासह मार्गदर्शक म्हणून बाळासाहेब सरवदे, प्रा. अशोक मखरे, संदीपान कडवळे, हनुमंत कांबळे, बाळासाहेब नारायण मखरे, सुधीर मखरे, प्रा. बाळासाहेब मखरे, अशोकराव पोळ, परमेश्वर मखरे, शिवाजी तानाजी मखरे, अॅड. सूरज मखरे, अॅड. किरण लोंढे हे असणार आहेत.