
इंदापूर अर्बन बँकेसाठी अर्ज दाखल करणे सुरू
इंदापूर, ता. ५ : इंदापूर अर्बन बँकेची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली असून, सोमवारपासून (ता. ५) अर्ज दाखल करण्यास सुरवात झाली असून, ९ जुलै रोजी मतदान होणार आहे.
इंदापूर अर्बन बँकेवर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे एकहाती वर्चस्व आहे. या बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यासाठी ५ हजार ८७३ सभासद मतदानासाठी पात्र आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दौंड येथील सहायक निबंधक एच. व्ही. तावरे यांची नियुक्ती केली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत येत्या ९ जूनपर्यंत आहे. गेल्या काही दिवसांपासून विविध कारणांनी बँक चर्चेत आहे. त्यामुळे बँकेची पंचवार्षिक निवडणूक लागणार की बिनविरोध होणार, याकडे इंदापूरकरांचे लक्ष लागले आहे.
बँकेच्या संचालक मंडळामध्ये १७ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया होत आहे. यामध्ये सर्वसाधारण जागेतून १२, अनुसूचित जाती जमाती १, महिला २, इतर मागास प्रवर्ग १ आणि भटक्या व भटक्या विमुक्त जाती जमाती १ अशा १७ जागांसाठी निवड होणार आहे.
निवडणूक कार्यक्रम
अर्ज दाखल करणे- ५ ते ९ जून
अर्ज छाननी- १२ जून
अर्ज माघारी- २७ जून
मतदान- ९ जुलै