ऐतिहासिक वृक्षाला, चित्रंबलाकांना श्रद्धांजली

ऐतिहासिक वृक्षाला, चित्रंबलाकांना श्रद्धांजली

Published on

इंदापूर, ता.१८ : इंदापूर शहरातील मालोजीराजे गढीच्या बाजूला असलेले शेकडो वर्षांपूर्वीचे चिंचेचे झाड पाडत असताना नगरपरिषदेकडून योग्य ती खबरदारी घेतली नाही. यामुळे शुक्रवारी (ता.१६) मृत्युमुखी पडलेल्या चित्रबलाक पक्ष्यांना तसेच ऐतिहासिक वृक्षाला इंदापूरवासियांच्या वतीने तिसऱ्याचा विधी करून, भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उपस्थितांना नगरपरिषद प्रशासनाचा जाहीर निषेध करीत संबंधितावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजी राजे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या इंदापूर शहरातील मालोजीराजे गढीवरील धोकादायक झालेल्या चिंचेचे झाडाची पालखीपूर्व योग्य पद्धतीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत होती. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले. दरवर्षी हजारो चित्रबलाक प्रजननासाठी इंदापूरमध्ये येतात. सध्या अनेक पक्षांची पिले झाडावरून उडून जाण्याच्या अंतिम टप्प्यात होती. मात्र या टप्प्यात नगरपरिषदेच्या नियोजनाच्या अभावामुळे या पक्ष्यांसह अंडी, पिलांचा नाहक बळी गेला आहे.
या घटनेबाबत पक्षिप्रेमी, इंदापूरकरांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणून घटना घडल्याच्या तिसऱ्या दिवशी विधी करण्यात आला. झाडाचा व मृत्युमुखी पडलेल्या पक्ष्यांच्या तिसऱ्याचा विधी करून दुःखदायक वातावरणात श्रद्धांजली वाहत नगरपरिषद प्रशासनाच्या कारभाराचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी प्रा.कृष्णा ताटे, शिवाजी मखरे, तानाजी धोत्रे, प्रशांत सिताप, रमेश शिंदे, प्रवीण पवार, गफुर सय्यद, हनुमंत कांबळे, महादेव चव्हाण, रामदास देवकर यांनी इंदापूरवासियांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात भावना व्यक्त करताना प्रशासनाचा जाहीर निषेध केला. यावेळी पक्ष्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अजय बनसोडे, वेदांत घोरपडे यांचेही आभार व्यक्त करण्यात आले. -

मुख्याधिकाांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
इंदापूरवासियांच्या वतीने श्रद्धांजली कार्यक्रम झाल्यानंतर इंदापूर पोलिस ठाण्यात एकत्र येत निवेदन देत इंदापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करायची मागणी करण्यात आली. यावेळी सदर घटनेबाबत वनविभाग पशुवैद्यकीय विभाग व पोलिस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनानंतर पुढील कार्यवाही केली जाईल. अशी माहिती इंदापूरचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली.
-

04020

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.