सरकारच्या रूपाने तिजोरीच आमच्याकडे : पाटील 
सरकारच्या रूपाने तिजोरीच आमच्याकडे : पाटील

सरकारच्या रूपाने तिजोरीच आमच्याकडे : पाटील सरकारच्या रूपाने तिजोरीच आमच्याकडे : पाटील

इंदापूर, ता.१८ : श्रेयवाद न करता तालुक्यासाठी जास्तीत जास्त निधी आणण्याचा आमचा प्रयत्न असून, तिजोरीला एक चावी नसते आणि सरकारच्या रूपाने तिजोरीच आमच्याकडे आहे, असा टोला राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भरणे यांच्या तिजोरीच्या चाव्या आमच्याकडे या व्यक्त्यव्यावर लगावला. तसेच इंदापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवी येत्या पाच वर्षात ५०० कोटी रुपयापर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. तसेच आगामी काळात बँकेच्या नवीन शाखा उघडण्यात येतील, अशी माहिती बँकेचे संस्थापक, भाजप नेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

इंदापूर अर्बन बँकेच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत हर्षवर्धन पाटील बोलत होते. यावेळी पाटील पुढे म्हणाले, कर्मयोगी शंकररावजी पाटील, राजेंद्रकुमार घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेची स्थापना करण्यात आली. त्यानंतर बँकेच्या माध्यमातून हजारो कुटुंबे उभी राहिली आहेत. बँकेचा नेट एनपीए शून्य टक्के असून, ग्रॉस एनपीए आगामी काळात शून्यावर आणण्याचा प्रयत्न आहे. बँकेच्या संचालक मंडळामध्ये तीन डॉक्टर, उद्योजक, वकील, व्यावसायिक, शिक्षण क्षेत्रात काम करणारे तसेच प्रगतशील शेतकरी, युवक यांचा समावेश करून, बँकेला चांगला चेहरा देण्याचे काम करण्यात आले आहे.

यावेळी हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते बाभुळगावच्या नूतन सरपंच रेश्माताई सुखदेव गरगुडे यांचा तसेच नेट परीक्षेत ६२६ गुण मिळाल्याबद्दल वैष्णवी जगन्नाथ सुरवसे हिचा सत्कार करण्यात आला. यावेळी विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.
-
दूधगंगाचे संकलन १ लाख लिटरपर्यंत
हर्षवर्धन पाटील म्हणाले, दूधगंगा दूध संघाचे दैनंदिन संकलन हे सध्या ९३ हजार लिटर झाल्याने दूध संकलन हे एक लाख लिटरच्या घरात पोहचले आहे. दूधगंगा दूध संघामार्फत प्रत्येकी १० दिवसाला रु.५ कोटी रुपयांचे पेमेंट बँकेत जमा केले जात आहे. आगामी काळात २ लाख लिटरपर्यंत संकलन नेण्याचा संकल्प आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com