इंदापुरातील शेतीसाठी आजपासून खडकवासला कालव्याचे आवर्तन

इंदापुरातील शेतीसाठी आजपासून 
खडकवासला कालव्याचे आवर्तन
Published on

इंदापूर, ता. २६ : खडकवासला कालव्यातून इंदापूर तालुक्यातील मदनवाडी ते तरंगवाडीपर्यंतच्या १४ पाझर तलावांमध्ये पाणी सोडण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री व जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार घेण्यात आला आहे. तसेच, खडकवासल्याचे इंदापूर तालुक्यातील शेतीला खरिपाचे आवर्तन गुरुवारपासून (ता. २७) पासून सुरू होत आहे, अशी माहिती भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
इंदापूर तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना खडकवासला कालव्यातून पाणी सोडण्यासंदर्भात पाटील यांनी मागणी केली होती. त्यानुसार फडणीस यांनी मंगळवारी (ता. २५) सूचना दिल्या. त्यानंतर पाटील यांनी यासंदर्भात कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले यांच्याशी शेतीसाठीचे आवर्तन व पाझर तलाव भरून घेण्यासंदर्भात चर्चा केली. त्यानुसार खडकवासल्याचे इंदापूर तालुक्यातील शेतीसाठीचे आवर्तन हे ‘टेल टू हेड’ पद्धतीने गुरुवारपासून सुरू होणार आहे. तसेच, मदनवाडी ते तरंगवाडीपर्यंतचे १४ पाझर तलावांमध्ये पाणी सोडण्यात येणार आहे. यामध्ये तालुक्यातील मदनवाडी, पोंधवडी, भादलवाडी, कळस, पिलेवाडी, काळेवाडी, पळसदेव, लोणी देवकर, न्हावी, रुई, गागरगाव, बळपुडी, बिजवडी (वनगळी), वडापुरी, तरंगवाडी हे तलाव आहेत.
इंदापूर तालुक्यातील शेटफळगढे, निरगुडे, पिंपळे, पोंधवडी, अकोले, भादलवाडी, कळस, पिलेवाडी, गोसावीवाडी, डाळज, रुई, न्हावी, लोणी देवकर, बळपुडी, कौठळी, खामगळवाडी, बिजवडी, पोंदकुलवाडी, गोखळी, तरंगवाडी यासह परिसरातील गावांमधील शेतीला खडकवासला कालव्यातून सोडण्यात येणाऱ्या आवर्तनाचा फायदा होणार असल्याचेही हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.