वाळू वाहतूकप्रकरणी
इंदापुरात वाहन जप्त

वाळू वाहतूकप्रकरणी इंदापुरात वाहन जप्त

इंदापूर, ता. १६ : येथे अवैधरीत्या वाळू उत्खनन करून वाहतूक केल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करीत वाहनासह १२ लाख ७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी पोलिस शिपाई विष्णू सुभाष केमदारने यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पवन संभाजी पठारे व अशोक ऊर्फ पिंटू नवनाथ खराडे यांच्या विरोधात इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. शहरातील शिंदे वस्तीजवळ हिसमनामे पवन संजय संभाजी पठारे (वय २४, रा. गलांडवाडी नंबर १, ता. इंदापूर) हा त्याच्या ताब्यातील पिवळ्या रंगाचा आयशर टेंपोमध्ये (क्र. एमएच ४२ बीएफ ६३४५) टेम्पो मालक अशोक ऊर्फ पिंटू नवनाथ खराडे (रा. इंदापूर) याच्या सांगण्यावरून वाळू चोरी करून त्याची वाहतूक करत होता. या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये वाळू वाहतुकीसाठी वापरलेल्या वाहनासह तब्बल १२ लाख ७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे करत आहेत.
-

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com