इंदापूर शहरामध्ये व्यापाऱ्यांची धावपळ

इंदापूर शहरामध्ये व्यापाऱ्यांची धावपळ

इंदापूर, ता.४ : इंदापूर शहरांमध्ये मंगळवारी (ता.४) दुपारी चारच्या दरम्यान जोरदार पावसाने हजेरी लावली. तब्बल दोन तास चाललेल्या या पावसामुळे उष्णतेच्या लाहीपासून इंदापूरकरांची मुक्तता झाली. तसेच गेल्या महिन्यापासून टंचाईने ग्रासलेल्या भागांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
गेल्या अनेक दिवसापासून तालुक्याच्या विविध भागांमध्ये पाण्याची तीव्रतांचा निर्माण झालेली होती तसेच तीव्रतेने सर्वसामान्य जनता ग्रासली होती. मात्र मुसळधार पावसापासून शहरासह ग्रामीण भाग वंचित होता. पावसामुळे शहरातील व्यापाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. रस्त्याच्या अनेक भागांमधून जोरदार पाणी वाहत होते.

06497

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com