शिवरायांच्या विचारांचे आचरण होणे गरजेचे : गारटकर

शिवरायांच्या विचारांचे आचरण होणे गरजेचे : गारटकर

इंदापूर, ता. ६ : ‘‘छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची प्रेरणा संपूर्ण जगाला दिली. त्यांचे विचार सर्वांना मार्गदर्शक आहेत. अशा विचारांचे आचरण तरुणांनी करणे गरजेचे आहे.’’ असे प्रतिपादन पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी केले.
इंदापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त नगरपरिषद प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन प्रसंगी प्रदीप गारटकर बोलत होते. यावेळी इंदापूरचे माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे, नागरी संघर्ष समितीचे प्रमुख प्रा. कृष्णा ताटे, शिवसेनेचे शहर प्रमुख महादेव सोमवंशी, धनंजय बाब्रस, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, अनिल राऊत, नगरसेवक अनिकेत वाघ, अमर गाडे, श्रीधर बाब्रस, गजानन गवळी, राजेश शिंदे, दादासाहेब सोनवणे, सुधीर मखरे, राकेश गानबोटे, हमीद आतार, इमरान शेख, अहमदरजा सय्यद, वसीम बागवान, हरिदास सामसे उपस्थित होते.
याप्रसंगी पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चा अध्यक्षा अंकिता पाटील-ठाकरे यांनीही इंदापूर नगरपालिकेसमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्या म्हणाल्या, ‘‘शिक्षण, संस्कार, संस्कृती, युद्धनीती, राजनीती, अर्थनीती, प्रशासन, रयतेचे राज्य या प्रती आदर्शाचे उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत.’’ यावेळी कैलास कदम, पांडुरंग शिंदे, तुषार खराडे, बबलू पठाण, सागर गानबोटे, ललेंद्र शिंदे उपस्थित होते. दरम्यान इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com