इंदापूरमध्ये एम.के.सी.एल ट्रेनिंग सेंटरचे उद्‍घाटन

इंदापूरमध्ये एम.के.सी.एल ट्रेनिंग सेंटरचे उद्‍घाटन

इंदापूर, ता. ६ : विद्यार्थ्यांना व्यावसायिक कौशल्य मिळवण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या एमकेसीएलचे ट्रेनिंग सेंटर आता इंदापूर येथे
विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये सुरू केले असून यामध्ये ३१० प्रकारच्या विविध व्यवसायांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षण केंद्राचे उद्‍घाटन तंत्रशिक्षण संचालनालयाचे माजी संचालक डॉ. एन. बी. पासलकर यांच्या हस्ते केले.
यावेळी डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे चे माजी प्राचार्य डॉ. विजय वढाई, शासकीय तंत्रनिकेतन पुणे चे प्राचार्य डॉ. आर. के. पाटील, तसेच माळेगाव पॉलिटेक्निक कॉलेजचे माजी प्राचार्य राजेंद्र वाबळे उपस्थित होते. या प्रशिक्षण केंद्र अंतर्गत एकूण ३१० कोर्सेस उपलब्ध आहेत. यातील कोर्सेस सायन्स, कॉमर्स, इंजिनिअरिंग (डिग्री तसेच डिप्लोमा) यामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच नोकरी करणाऱ्यांना त्यांचे कौशल्य वाढविण्यास उपयोगी होतील. हा कोर्सेस हे क्रेडिट १ ते क्रेडिट ५ स्तरावरील असून ॲकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट मध्ये ग्राह्य धरले जाणार आहेत. प्रशिक्षणार्थीला त्याचा रोजगार मिळवण्यासाठी उपयोग होईल अशी माहिती केंद्र समन्वयक प्राध्यापक सदानंद भुसे यांनी दिली.
तसेच महाराष्ट्र शासनाची ‘सारथी’ द्वारा मिळणाऱ्या शिष्यवृत्ती चा लाभ या कोर्सला ॲडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळेल अशी माहिती डॉ एन. बी. पासलकर यांनी यावेळी दिली. तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे यांनी बोलताना या ट्रेनिंग सेंटरचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांचे व्यावसायिक शिक्षण वाढविण्याकरिता निश्चित उपयोग होईल व त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या कोर्सला प्रवेश घ्यावा असे आवाहन केले.
या कार्यक्रमाच� ५०० रुपयांचा बाजारभाव मिळाला आहे. बाजारात ४०० क्रेट विक्री झाली.
बाजारात डाळिंबाच्या एका क्रेटला चार हजार ५००, तीन नंबरला तीन हजार, एक नंबर डाळिंबास तब्बल ५ हजार ५०० रुपयांचा बाजारभाव मिळाला आहे.
कांद्याप्रमाणेच आता डाळिंबाचे देखील लिलाव मोठ्या प्रमाणावर होऊ लागले आहेत, अशी माहिती सभापती संजय काळे, सचिव रूपेश कवडे संचालक नबाजी घाडगे, व्यवस्थापक प्रशांत महांबरे यांनी दिली.
दरम्यान, बाजार समितीत पारनेर, संगमनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, शिरूर, नगर येथून शेतकरी डाळिंब विक्रीसाठी येत असतात. त्यामुळे पुणे आणि नगर जिल्ह्यासाठी ही महत्त्वाची बाजार पेठ आहे. हे मार्केट कांदा लिलावासाठी प्रसिद्ध आहे पण डाळिंबाला देखील चांगला बाजारभाव मिळत असल्याने डाळिंबासाठी ही बाजारपेठ आता चर्चेत येऊ लागली आहे तसेच डाळिंबाची आवक कमी होत चालल्याने डाळिंबाच्या बाजारभावात वाढ झालेली आहे, अशी माहिती डाळिंब आडतदार प्रवीण लेंडे, विशाल कुटे, पप्पू सरोदे, संदीप लोढा, गणेश गडगे, निशिकांत ढोमसे यांनी दिली.

04716

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com