इंदापुरात अनधिकृत पाच होर्डिंग जमीनदोस्त

इंदापुरात अनधिकृत पाच होर्डिंग जमीनदोस्त

इंदापूर, ता. ७ : मुंबईतील धोकादायक होर्डिंगमुळे अनेकांना जीव गमवावा लागला होता. इंदापूर शहरासह परिसरातील पुणे - सोलापूर महामार्ग, इंदापूर - अकलूज मार्ग, इंदापूर - बारामती मार्गावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत होर्डिंग उभारण्यात आले होते. यावर आता इंदापूर नगर परिषदेने कारवाई सुरू केली असून, पहिल्या टप्प्यात शहरातील पाच अनधिकृत होर्डिंग भुईसपाट करण्यात आले. सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनमरणाचा विषय बनलेले होर्डिंग जमीनदोस्त केल्याने नागरिकांनी कारवाईचे स्वागत केले आहे.

इंदापूर शहर व तालुक्यामध्ये विविध ठिकाणी ५०हून अधिक होर्डिंग असून यापैकी काहींचे प्रस्ताव नगरपालिकेकडे मान्यतेसाठी प्राप्त झालेले आहेत. इतर अनधिकृत होर्डिंगबाबत रीतसर कोणतीही परवानगी घेतली नसल्याने होर्डिंगधारकांना इंदापूर नगर परिषदेच्यावतीने मुख्याधिकारी रमेश ढगे यांनी नोटीसा बजावल्या आहेत. यामध्ये त्यांची परवानगी, स्ट्रक्चरल ऑडिट याबाबतचा खुलासा करण्याचे नमूद केले होते, अन्यथा कारवाईचा इशारा देण्यात आला होता.

नोटीसची मुदत संपल्याने धोकादायक असलेले अनधिकृत होर्डिंग इंदापूर नगर परिषदेच्यावतीने काढण्यात आले. यामध्ये शहरातील बाबा चौक येथील इमारतीवरील दोन, इंदापूर महाविद्यालयासमोरील दोन तसेच तहसील कार्यालयाशेजारील एक होर्डिंग असे एकूण पाच होर्डिंगवर मुख्याधिकारी रमेश ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. या मोहिमेत शहर अभियंता शिवदत्त भोसले, सिव्हिल इंजिनिअर प्रसाद देशमुख, अतिक्रमण विभाग प्रमुख योगेश सरवदे, आरोग्य विभाग मुकादम दत्तात्रेय ढावरे तसेच आरोग्य विभागाचे व वीज विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते.

दरम्यान, नगर परिषदेकडून करण्यात आलेल्या या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत होत असून अजूनही काही भागांमध्ये विनापरवाना असलेले धोकादायक होर्डिंग व जाहिरात फलकांचे सांगाडे काढून टाकून नागरिकांच्या जीविताचे रक्षण करावे, अशी मागणी होत आहे.

मुंबईतील दुर्घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे शहरातील होर्डिंगबाबत माहिती संकलित करून अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच यापुढे शहरातील कोणत्याही भागात होर्डिंग उभे करण्यासाठी नगर परिषदेची रीतसर परवानगी घ्यावी, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल.
- रमेश ढगे, मुख्याधिकारी, इंदापूर नगर परिषद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com