धाक दाखवून आईसह चाललेल्या मुलगी दुचाकी स्वाराला लुटले

धाक दाखवून आईसह चाललेल्या मुलगी दुचाकी स्वाराला लुटले

इंदापूर, ता. ८ : इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी ते बिजवडी या मार्गावरून आईसह दुचाकीवरून घराकडे निघालेल्या दोघींना चाकू आणि कोयत्याचा धाक दाखवून लुटण्याची घटना घडली असून यामध्ये चोरट्यांनी तब्बल १ लाख ७ हजार रुपयांचे दागिने चोरून नेत पोबारा केला आहे.
याबाबत सुधीर विकास शिंदे (वय २९ वर्ष, रा. बिजवडी ता. इंदापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शुक्रवारी (ता. ६) रोजी रात्री नऊच्या दरम्यान त्यांची आई रतन विकास शिंदे व मुलगी स्वरा हिला घेऊन दुचाकी (क्र. MH 42 L१५९९) वरून लासुर्णे, निमगाव केतकी पोंदकुलवाडी, कारखाना रोडने बिजवडी कडे जात असताना निमगाव केतकी ते बिजवडी दरम्यान पाठीमागून लाल रंगाच्या पल्सर वर तोंडाला काळे कापड बांधून आलेल्या तीन अज्ञात चोरट्यांनी दुचाकी थांबवीत चाकू आणि कोयत्याचा धाक दाखवत आईच्या गळ्यातील सोन्याचे मनी, कानातील दोन झुबे व दोन फुले, सोन्याची अंगठी व चांदीच्या दोन अंगठ्या असे एकूण एक लाख ७ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढून घेऊन पोबारा केला. यावरून इंदापूर पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com