जगातील सर्वात हिंमतवान योध्दा म्हणजे शेतकरी

जगातील सर्वात हिंमतवान योध्दा म्हणजे शेतकरी

Published on

इंदापूर, ता.६ : ‘‘कोणतीही शास्त्रीय पदवी नसताना संशोधन करणारा,असंख्य संकटावर मात करुन काळ्या मातीमधून सोने पिकवणारा जगातील सर्वात हिंमतवान धाडसी योध्दा म्हणजे शेतकरी आहे,’’ असे गौरवोद्गार इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन खुडे यांनी व्यक्त केले.

इंदापूर पंचायत समिती व तालुका कृषी विभाग यांच्या वतीने पंचायत समितीच्या सभागृहात कृषी दिनानिमित्त कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या शेतकऱ्यांच्या सन्मानप्रसंगी खुडे बोलत होते. यावेळी झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाचा कृषिभूषण मिळवणारे वरकुटे बुद्रुक येथील शेतकरी विजयसिंह बालगुडे यांच्यासह कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारे, सेंद्रिय खतांचा वापर करुन शेती करणारे संतोष कुदळे (पिटकेश्वर), आनंद कोरंटक (नृसिंहपूर), पांडुरंग बरे (कचरेवाडी), जगन्नाथ भोंग ( इंदापूर), राजेंद्र गिरमे (बावडा), श्रीरंग देवडे ( निरनिमगाव), अविराज निंबाळकर (शेटफळ हवेली) यांचा शाल, श्रीफळ,प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
दरम्यान, खुडे यांच्या हस्ते पंचायत समितीच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.

या प्रसंगी प्रगतीशील शेतकरी राजेंद्र गिरमे, पंचायत समितीचे तालुका कृषी अधिकारी अमर फडतरे, तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब रुपनवर, कृषी विस्तार अधिकारी अजित घोगरे, युनुस शेख, टी.आर.गवारी यांच्या हस्ते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

पंचायत समितीचे तालुका कृषी अधिकारी अमर फडतरे यांनी सूत्रसंचालन केले. मंडल कृषी अधिकारी योगेश फडतरे आदींसह विविध गावचे ग्रामसेवक, शेतकरी, कृषी सहाय्यक उपस्थित होते.
-
06647

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.