इंदापूरला पोलिसांकडून चोख बंदोबस्त

इंदापूरला पोलिसांकडून चोख बंदोबस्त

Published on

इंदापूर, ता. ८ : तुकाराम महाराज पालखी सोहळा इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे मंगळवारी (ता. ९) तर बुधवारी इंदापूरला, गुरुवारी सराटी येथे मुक्कामी येत आहे. या पार्श्‍वभूमीवर पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून काळजी घेतली जात असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी दिली.
पालखी सोहळ्यातील सर्व भाविकांना चांगल्या सोयी सुविधा मिळाव्यात, त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, वाहतूक कोंडीचा सामना करण्याची आवश्यकता पडू नये यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. त्यासाठी पोलिस विभागाने रहदारी नियमन पथक सज्ज झाले आहे. या काळात चोरीसारख्या घटनांवर आळा घालण्यासाठी पथक सज्ज आहे. पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक संजय जाधव, रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड कार्यरत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.