गोजूबावी येथे ‘सेवा पंधरवडा’ निमित्त शिवार फेरी
शिर्सुफळ, ता. १४ : गोजुबावी (ता. बारामती) येथे १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या ‘सेवा पंधरवडा’ आयोजनाबाबत महसूल विभागाच्या वतीने गोजुबावी ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभा घेऊन शिवार फेरी काढण्यात आली. या शिवार फेरीत पाणंद रस्त्याची पाहणी करण्यात आली. जे पाणंद रस्ते वापरात असून देखील त्यांची नकाशात नोंद नाही अशा रस्त्यांची नकाशावर नोंद घेण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी बारामती उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार गणेश शिंदे, मंडल अधिकारी चेतन पोळ यांचे मार्गदर्शन मिळाल्याचे ग्राममहसूल अधिकारी प्रतीक्षा कोरपड यांनी सांगितले. यावेळी सरपंच प्रतीक्षा भोसले, उपसरपंच हिराबाई जाधव, ग्रामसेवक जहागीर मुलाणी, कृषी अधिकारी प्रणिता ननावरे, संतोष आटोळे, नितीन गटकळ, याकूब शेख, सचिन गावडे, सचिन जाधव, शयाम पोटरे, लालासो आटोळे, सुवर्णा जाधव, आंनद कदम, बाळासो आटोळे, रणजित कोकरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.