...तर ‘शेतकरी नवरा हवा’ असे दिवस येऊ शकतात निंबूत येथे बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांचे प्रतिपादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

...तर ‘शेतकरी नवरा हवा’ असे दिवस येऊ शकतात
निंबूत येथे बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांचे प्रतिपादन
...तर ‘शेतकरी नवरा हवा’ असे दिवस येऊ शकतात निंबूत येथे बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांचे प्रतिपादन

...तर ‘शेतकरी नवरा हवा’ असे दिवस येऊ शकतात निंबूत येथे बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांचे प्रतिपादन

sakal_logo
By

सोमेश्वरनगर, ता. ४ : माळरानावर अंजीर शेती फुलवून आपण आर्थिक प्रगती साधली आहे. आपला मला अभिमान वाटतो. असे शेतकरी तयार झाले तर ‘शेतकरी नवरा हवा’ असे दिवस येऊ शकतात, अशा भावना खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केल्या.

निंबूत (ता. बारामती) येथील दीपक व गणेश जगताप या बंधूंनी माळरानावर फुलविलेली अंजीर बाग पाहण्यासाठी सुळे यांनी जवळपास एक तास वेळ दिला. सात एकर क्षेत्रावरील निरोगी आणि दर्जेदार फळे असलेली बाग पाहून सुळे भारावल्या. त्यांनी जगताप कुटुंबातील महिलांनाही या यशाचे श्रेय दिले. शेतातील मजुरांसोबतही त्यांनी छायाचित्रे काढून घेतली आणि स्वतःही हा प्रयोग फेसबुक लाइव्ह केला. या प्रसंगी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, माणिक झेंडे, प्रमोद काकडे, दत्ता चव्हाण, विराज काकडे, राहुल काकडे, अजिंक्य टेकवडे, विनायक जगताप, सुमन जगताप, धनश्री जगताप, नीलम जगताप आदी उपस्थित होते.

२००७ साली माळरान फोडून चार प्रकारच्या फळबागा केल्या. त्यात अंजीर चांगले येऊ शकते, असे लक्षात आल्यावर त्यावर भर दिला. चुकांतून शिकत गेलो. आता सात एकर क्षेत्र झाले असून, राज्यातील उत्कृष्ट भाव मिळतो आणि सर्वोच्च उत्पादन मिळते. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बागेस भेट दिल्यापासून पंधरा जिल्ह्यांतील लोक येऊन गेले, अशी माहिती जगताप यांनी दिली. सुळे यांनी झाडातील अंतर, पानांचा व फळांचा दर्जा, मार्केटिंग याबाबत माहिती घेतली व जगताप बंधूंच्या पाठीवर थाप टाकली.

अजितदादा मुख्यमंत्री असल्यासारखं वाटायला लागलंय
सत्तेत असलेले लोक विरोधी पक्षनेत्याच्या विरोधात रस्त्यावर उतरत आहेत. त्यांना पाहून भाजप विरोधात आहे आणि अजितदादा मुख्यमंत्री असल्यासारखं वाटायला लागलंय. राज्यापुढे, देशापुढे महागाई, बेरोजगारी असे प्रश्न आहेत. डॉक्टरांचा संप झाला आता वीज कर्मचाऱ्यांचा सुरू आहे. अशा प्रश्नांना बगल देण्यासाठी अजितदादांच्या वक्त्यव्याचा चुकीचा अर्थ काढून आंदोलने चाललीत. ती चुकीची आहेत, अशा भावना सुप्रिया सुळे यांनी या वेळी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.