‘शिंदे सरकार प्रतिष्ठान’चा आज राज्यस्तरीय मेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘शिंदे सरकार प्रतिष्ठान’चा 
आज राज्यस्तरीय मेळावा
‘शिंदे सरकार प्रतिष्ठान’चा आज राज्यस्तरीय मेळावा

‘शिंदे सरकार प्रतिष्ठान’चा आज राज्यस्तरीय मेळावा

sakal_logo
By

सोमेश्वरनगर, ता. ८ : वाघळवाडी (ता. बारामती) येथील सोमेश्वर पॅलेसमध्ये मंगळवारी (ता. १०) सकाळी दहा वाजता ‘महाराजा महादजी शिंदे सरकार प्रतिष्ठान’च्या वतीने राज्यस्तरीय स्नेहमेळावा आयोजित केला आहे, अशी माहिती कार्याध्यक्ष राजवर्धन शिंदे व स्वागताध्यक्ष आर. एन. शिंदे यांनी दिली.
स्वराज्याचे सेनापती दत्ताजीराव शिंदे, महापराक्रमी महादजी शिंदे यांच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी राज्यातील व राज्याबाहेरील तब्बल ३६० गावांतील शिंदे परिवार दरवर्षी दत्ताजीराव शिंदे यांच्या स्मृतिदिनानिमित्त गेले बारा वर्ष एकत्र येतो. यावर्षी नीरा-बारामती रस्त्यावरील वाघळवाडी येथील सोमेश्वर पॅलेसमध्ये विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत हा मेळावा सकाळी दहा ते एक या वेळेत होणार आहे. खासदार श्रीनिवास पाटील, खासदार वंदना चव्हाण, माजी जलसंपदा मंत्री शशिकांत शिंदे, दत्तात्रेय भरणे, संजय जगताप, बाळासाहेब सोळसकर आदी राहणार आहेत.

हुतात्मा अशोक कामठे यांना शौर्य पुरस्कार
मुंबई हल्ल्यातील हुतात्मा पोलिस आयुक्त अशोक कामठे यांना महाराजा महादजी शिंदे प्रतिष्ठानच्या वतीने मरणोत्तर ‘रणबहाद्दर दत्ताजीराव शिंदे शौर्य पुरस्कार’ देऊन गौरविले जाणार आहे. याशिवाय हिमाचल प्रदेशातील कापड उद्योजक अजित शिंदे, कीर्तनकार-अभिनेते भरत शिंदे, युवा उद्योजक पृथ्वीराज शिंदे, राज्य करनिरीक्षक मंगेश शिंदे, पाटबंधारे खात्याचे अधिक्षक अभियंता जयंत शिंदे, व्याख्याते गणेश शिंदे, हवामान तज्ज्ञ बापूसाहेब शिंदे, शिंदे डेअरीचे रणजित दत्तात्रेय शिंदे, जनार्दन शिंदे, रणजित पोपट शिंदे यांनाही विशेष पुरस्काराने गौरविले जाणार आहे.