Sat, April 1, 2023

नीरा येथील माजी उपसरपंचांस
तिघांकडून शिवीगाळ, मारहाण
नीरा येथील माजी उपसरपंचांस तिघांकडून शिवीगाळ, मारहाण
Published on : 12 March 2023, 12:55 pm
सोमेश्वरनगर, ता. १२ : नीरा (ता. पुरंदर) येथे माजी उपसरपंचास जातिवाचक शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी जेजुरी पोलिसांत एका डॉक्टरसह तिघांवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. डॉ. दिलीप कांतिलाल बोरा, नितीन कांतिलाल बोरा व मीना दिलीप बोरा, अशी आरोपींची नावे आहेत.
याप्रकरणी माजी उपसरपंच कुमार जनार्दन मोरे यांनी जेजुरी पोलिसांत फिर्याद दिली की, मोरे यांनी एक गुंठा जागेचा कुलमुखत्यार केला आणि शालेय साहित्य विक्रीसाठी टपरी टाकली. ती टपरी नितीन बोरा यांच्या दुकानाच्या समोर आल्याने वाद निर्माण झाला. टपरीचे मुरूमीकरण करण्यासाठी मोरे गेले असता त्यांना बोरा कुटुंबीयांनी जातिवाचक उल्लेख करत शिवीगाळ केली. नितीन बोरा यांनी गजाने मारहाण केली.