विखुरलेल्या मजुरांना आरोग्य सेवा द्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विखुरलेल्या मजुरांना आरोग्य सेवा द्या
विखुरलेल्या मजुरांना आरोग्य सेवा द्या

विखुरलेल्या मजुरांना आरोग्य सेवा द्या

sakal_logo
By

सोमेश्वरनगर, ता. १५ : ऊसतोडणी मजुरांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवणारा ''सोमेश्वर'' हा राज्यातील पहिला कारखाना आहे. शिक्षण मिळणे हा प्रत्येक मुलाचा अधिकारच आहे. याशिवाय मुलांना, मजुरांना आरोग्यसेवेचीही मदत व्हावी यासाठी गेली सात वर्ष शिबिराचे आयोजन केले जात आहे. आरोग्य विभागाने गावोगाव विखुरलेल्या ऊस तोड मजुरांनाही आरोग्य सेवा द्यावी, असे आवाहन सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी केले.
जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग, प्राथमिक आरोग्य केंद्र होळ व सोमेश्वर सहकारी साखर कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने ऊसतोड मजुरांसाठी सर्वरोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी जगताप बोलत होते. यावेळी तीनशे जणांची तपासणी करण्यात आली.

ऊसतोडणी मजुरांमध्ये त्वचेचे आणि संसर्गजन्य आजारांचे प्रमाण जास्त आढळते, असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी सांगितले.
दरम्यान, साई सेवा मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाकडून मोफत ईसीजीची सोय केली होती. याप्रसंगी उपाध्यक्षा प्रणिता होळकर, संचालक शैलेश रासकर, जितेंद्र निगडे, प्रवीण कांबळे, रणजित मोरे, तुषार माहूरकर, वाघळवाडीचे सरपंच हेमंत गायकवाड, उपस्थित होते.
डॉ. विद्यानंद भिलारे, डॉ. तात्यासाहेब कोकरे, डॉ. राहुल शिंगटे, डॉ. विद्या नाझीरकर, डॉ. आर. डी. मदने, डॉ. श्रीमंत पाटील, डॉ. कर्णवीर शिंदे यांनी तपासणीचे काम केले. ''कोपीवरची शाळा'' प्रकल्पाचे समन्वयक संतोष शेंडकर, परवेज मुलाणी, शिवाजी चव्हाण, योगिता माळी, कुसुम शिंदे आदींनी शिबिराचे आयोजन केले. नौशाद बागवान यांनी सूत्रसंचालन तर अमोल कर्चे यांनी आभार मानले.
---
02428