विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेवर डॉ. वायदंडे यांची यांची निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेवर
डॉ. वायदंडे यांची यांची निवड
विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेवर डॉ. वायदंडे यांची यांची निवड

विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेवर डॉ. वायदंडे यांची यांची निवड

sakal_logo
By

सोमेश्वरनगर, ता. २२ : येथील मु. सा. काकडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या व्यवस्थापन परिषदेवर सदस्य म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. वायदंडे यांच्या रूपाने महाविद्यालयास व परिसरास ५० वर्षांनी हा बहुमान मिळाला आहे.
डॉ. वायदंडे यांची नुकतीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेवर सदस्य म्हणून प्राचार्य गटातून बिनविरोध निवड झाली होती. तसेच, मागील पंचवार्षिक कालावधीत त्यांनी विद्यापीठाच्या अधिसभा, अभ्यास मंडळ, तक्रार निवारण समितीवरही काम केले आहे. ते महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथ निवड समितीचे सदस्य देखील होते. महाराष्ट्रातील विविध सामाजिक, शैक्षणिक संस्थांशी त्यांचा जवळचा संबंध आहे. या विविधांगी कामाचा फायदा होऊ शकेल, या हेतूने त्यांना बिनविरोध संधी मिळाल्याचे मानले जाते.
दरम्यान, ५० वर्षांपूर्वी महाविद्यालयाच्या तत्कालीन प्राचार्या डॉ. सुशीला आठवले या व्यवस्थापन परिषदेवर गेल्या होत्या. तर, तालुक्यातून सुनेत्रा पवार, सुनंदा पवार यांनी हा बहुमान प्राप्त केला होता. महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतीश काकडे, अभिजित काकडे, सतीश लकडे यांनी त्यांचे अभिनंदन केले.