चार कारखान्यांची एफआरपी थकली

चार कारखान्यांची एफआरपी थकली

संतोष शेंडकर : सकाळ वृत्तसेवा
सोमेश्वरनगर, ता. ६ : पुणे जिल्ह्यातील सतरापैकी नऊ कारखान्यांनी शेतकऱ्यांना शंभर टक्के एफआरपी अदा केली आहे, तर चार कारखाने पूर्णत्वाच्या जवळ आहेत. परंतु, चार कारखान्यांकडे अजूनही एफआरपी थकली आहे. साखर उताऱ्यात अव्वल असलेला ‘सोमेश्वर’ एफआरपीतही अव्वल ठरला आहे. तर, तोडणी वाहतूक खर्चावर नियंत्रण ठेवण्यात ‘विघ्नहर’ला यश मिळाले आहे.

राज्यातील २१० साखर कारखान्यांनी २६ हजार ५९० कोटी एफआरपीपैकी ९७.२२ टक्के एफआरपी अदा केली आहे. साखर आयुक्तालयाने ५ मे रोजी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार पुणे जिल्ह्यातील सोमेश्वर, माळेगाव, भीमाशंकर, विघ्नहर, बारामती अॅग्रो, दौंड शुगर, श्रीनाथ, अनुराज, पाटस या कारखान्यांनी शंभर टक्के रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे. काहींनी एफआरपीपेक्षाही जास्त रक्कम दिली आहे. एफआरपीच्या दोन टप्प्यातील धोरणानुसार साखर उतारा व तोडणी वाहतूक खर्चाचे प्रमाणीकरण करून घेतल्यानंतर एफआरपीचा अंतिम आकडा जाहीर केला जात आहे. या प्रमाणीकरणानंतर संत तुकाराम, छत्रपती, पराग, व्यंकटेश या कारखान्यांकडे एफआरपीपोटी शेतकऱ्यांची किरकोळ बाकी निघाली आहे. परंतु, घोडगंगाने आतापर्यंत ८१ टक्के, नीरा भीमाकडे ७८ टक्के; तर कर्मयोगी व राजगडकडे ५० टक्के एफआरपी थकली आहे.

‘बारामती ॲग्रो’, ‘संत तुकाराम’चा खर्च सर्वाधिक
साखर उताऱ्यात दौंड शुगर पहिल्या स्थानी पोचणे अपेक्षित आहे, परंतु प्रमाणीकरणानंतर सद्यःस्थितीत सोमेश्वर अग्रभागी असून, त्यापाठोपाठ माळेगाव व भीमाशंकरने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. साखर उताऱ्यानुसारच एफआरपीचे दर निश्चित होतात. त्यातून तोडणी वाहतूक वजा करून शेतकऱ्यांना निव्वळ एफआरपी मिळते. सदर तोडणी वाहतूक खर्चावर विघ्नहर, भीमा पाटस, छत्रपती, माळेगाव, नीरा भीमा, दौंड शुगर यांनी चांगले नियंत्रण ठेवले आहे. बारामती अॅग्रो व संत तुकाराम यांचा तोडणी वाहतूक खर्च सर्वाधिक आहे.

सद्यःस्थितीत एफआऱपी, तोडणी वाहतूक खर्च (रू. प्रतिक्विंटलमध्ये)
कारखाना उतारा (टक्के) एकूण एफआरपी तोडणी वाहतूक निव्वळ एफआरपी दिलेली एफआरपी
सोमेश्वर ११.९३ ३५६१.१८ ७०६.६६ २८५४.५२ १००
माळेगाव ११.८१ ३५२५.१९ ६७७.७५ २८४७.८४ १००
भीमाशंकर ११.५७ ३४५२.६० ७०१.६७ २७५०.९३ १००
विघ्नहर १०.२५ ३०५० ६४७.०५ २४०२.९५ १००
बारामती अॅग्रो १०.२५ ३०५० ७८५.१३ २२६४.८७ १००
दौंड शुगर १०.२५ ३०५० ६९२.४३ २३५७.५७ १००
श्रीनाथ म्हस्कोबा १०.२५ ३०५० ६७०.७४ २३७९.२६ १००
अनुराज १०.२५ ३०५० ७२४.४० २३५९.६० १००
भीमा पाटस १०.२५ ३०५० ६५० २४०० १००
संत तुकाराम ११.४५ ३४१६ ७८२ २६३४ ९८.७१
छत्रपती १०.६१ ३१५९.८० ६९७.३६ २४६२.४४ ९५.४३
पराग अॅग्रो ११.४५ ३४१६ ७५९.१५ २६५६.८५ ९४.१०
व्यंकटेश ११.२७ ३३६१ ७००.६७ २६६०.४३ ९३.९७
घोडगंगा ११.४७ ३४२१.८० ७५२.८९
२६६८.९१ ८१.६१
नीरा भीमा १०.०२ २९७९.८५ ६९१.९९ २२८७.८६ ७८
कर्मयोगी १०.२५ ३०५० ७०१.०८ २३४८.९३ ५०.४८
राजगड ९.५० २८२१ ७६४.७६ २०५६.४९ ४९.१३

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com