सोमेश्‍वरास भाविकांचे पावसासाठी साकडे

सोमेश्‍वरास भाविकांचे पावसासाठी साकडे

सोमेश्वरनगर, ता. २१ : करंजे (ता. बारामती) येथील श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थानाला पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त सुमारे तीस हजार भाविकांनी भेट देऊन स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन घेतले. यावेळी भाविकांनी पावसासाठी साकडे घातले.
यात्रेच्या विरळ गर्दीवरून आणि दुकानदारांच्या कमी झालेल्या व्यवसायावरून दुष्काळाचे सावट गडद झाल्याचेही चित्र स्पष्ट झाले. सौराष्ट्रातील सोरटी सोमनाथाचे प्रतिरूप मानले गेलेले सोमेश्वर देवस्थान आज पहाटेपासून गजबजले. दिवसभर किरकोळ स्वरूपात गर्दी झाली होती. रांगा लावून भाविकांनी प्रसिद्ध शिवलिंगाच्या दर्शनाचा लाभ घेतला. हर हर महादेव असा जयघोष करत ''भाविक पाऊस पडू दे'' अशी श्रध्दा व्यक्त करत होते.
दरम्यान, मध्यरात्री बारामतीचे प्रांताधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार गणेश शिंदे यांच्या हस्ते सोमेश्वराच्या पिंडीस महाभिषेक करण्यात आला. याप्रसंगी सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, संचालक ऋषी गायकवाड, जमीर शेख, तलाठी दादासाहेब आगम, तानाजी जाधव, जया गायकवाड, देवस्थानचे अध्यक्ष प्रताप भांडवलकर, खजिनदार योगेश भांडवलकर, राहुल भांडवलकर उपस्थित होते. सकाळ सत्रात भाविकांसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष विक्रम भोसले, प्रा. गोरक्षनाथ इंगळे, संदीप साळुंके यांनी अन्नदान केले. सायंकाळी पुरुषोत्तम जगताप व रोहिणी जगताप यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन केले होते. तहसीलदार गणेश शिंदे यांच्या पुढाकाराने यावर्षी वाहन पार्किंगचा प्रश्न मिटला असून विस्तीर्ण जागेचे सपाटीकरण करून व्यवस्था केली.
वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन काळे, उपनिरीक्षक योगेश शेलार यांच्या पथकाने दर्शन रांगांमध्ये खुबीने बदल केल्याने भाविकांना सुलभतेने दर्शन घेता आले. ज्योती कुटे यांच्या पोलिसमित्र या महिला पथकाने मदत केली. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांच्या नेतृत्वाखालील होळ आरोग्य केंद्राने तसेच साई सेवा हॉस्पिटलने आरोग्यसेवा पुरविली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com