निंबूत येथे जाळला घराचा नवा दरवाजा

निंबूत येथे जाळला घराचा नवा दरवाजा

सोमेश्वरनगर, ता. ११ : निंबूत (ता. बारामती) येथे नव्याने बांधकाम सुरू असलेल्या घराचा नवा सागवानी दरवाजा जाळण्याचा प्रकार घडला आहे. एकल महिला स्वकष्टाने बंगला उभारत असताना व्देषबुध्दीतून हा खोडसाळपणा केला असल्याची चर्चा आहे. याप्रकरणी अज्ञात इसमावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

निंबूत येथे पुणे जिल्हा बँकेच्या सोमेश्वरनगर शाखेच्या कर्मचारी सुषमा सचिन काकडे या एकल महिला आपल्या सासूबाई आणि दोन लहान मुलांसोबत छोट्याशा खोलीत राहत आहेत. थोडीशी शेतजमीन आणि बँकेतील नोकरी याच्या सहाय्याने तेराशे स्व्केअर फुटाचा बंगला सध्या बांधत आहेत. पतीनंतरही कुटुंब निर्धाराने उभे केले आहे. बंगल्याचे बांधकाम सुरू असतानाच काही वस्तू गायब होत होत्या. काही दिवसांपूर्वीच बंगल्याला सागवानी चौकट आणि दरवाजा बसविला होता. मात्र शनिवारी पहाटे प्लॅस्टिकचे काही कागद पेटवून उंबऱ्यावर ठेवले. यामध्ये उंबरा पूर्ण तर दरवाजा अर्धवट जळाला. यामुळे भयभीत महिलांनी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याअंतर्गत करंजेपूल दूरक्षेत्र गाठले. पोलिसांनीही अज्ञात इसमावर खोडसाळपणाने तीस हजारांचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मागील काही महिन्यांत निंबूतमध्ये घरफोडीचे, शिवाय महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी लंपास करण्याचे प्रकार घडले होते. अशात दरवाजा जाळण्याचा प्रकार घडल्याने ज्या घरात केवळ महिला राहतात त्यांना असुरक्षित वाटू लागले आहे. धाडसी आयपीएस अधिकारी दर्शन दुगड यांच्याकडून महिलांना अपेक्षा आहेत.

दरम्यान, काकडे म्हणाल्या, आम्ही केवळ महिला राहत आहोत म्हणून आम्हाला भयभीत करण्याच्या उद्देशाने हे कृत्य करण्यात आले आहे.

03525

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com