‘सोमेश्‍वर’चे २० मे रोजी खोडवा उसाबाबत चर्चासत्र

‘सोमेश्‍वर’चे २० मे रोजी खोडवा उसाबाबत चर्चासत्र

सोमेश्वरनगर, ता. १४ : ऊस लागवड हंगामाचा प्रारंभ १५ जूनच ठेवावा की १ जुलै करावा, आडसाली ऊस लागवडीवर नियंत्रण कसे आणावे आणि खोडवा उसात वाढ कशी करावी अशा विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी सोमेश्वर कारखान्याने २० मे रोजी सकाळी १० वाजता मुख्य कार्यालयासमोर चर्चासत्राचे आयोजन केले आहे.
संचालक मंडळ दरवर्षी धोरण ठरवतेच मात्र त्यावरून अनेकदा वादविवाद झडतात. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेतल्यास धोरणे अधिक पारदर्शी ठरणार आहे, असे काही शेतकऱ्यांचे मत आहे.
सोमेश्वर कारखान्याचे चार तालुक्यात कार्यक्षेत्र असून सतत ऊसक्षेत्रात वाढ होत चालली आहे. २००६ पूर्वी सलग ४८ वर्ष सोमेश्वर गेटकेनवर अवलंबून होता. मात्र शेतकऱ्यांचा ऊसलागवडीकडे वाढलेला कल, उसाच्या एफआऱपीची हमी आणि सोमेश्वरची विश्वासार्हता त्यामुळे सोमेश्वर स्वयंपूर्ण झाला. २००७ ला गाळपक्षमता ५ हजार टन केली होती आता ती साडेसात हजार टन प्रतिदिन झाली आहे तरीही गाळप उरकायला किमान पाच ते सहा महिने जात आहेत. महत्वाची समस्या म्हणजे बहुतांश शेतकऱ्यांचा आडसाली ऊस लागवडीवरच भर असतो. परिणामी गेले अनेक हंगामात आडसाली ऊस फेब्रुवारी ते मार्चपर्यंत तोडला जातोय. त्यामुळे उरलेल्या पूर्वहंगामी, सुरू आणि खोडवा उसाचे तुटताना वीस महिन्यांपेक्षा अधिक वय होऊन शेतकऱ्यांचेच प्रचंड नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर आडसालीच्या धोरणाबाबत अत्यंत गांभीर्याने विचार करावा लागणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com