निंबूत येथील निंबाळकर कुटुंबास
मुख्यमंत्र्यांचा मदतीचा हात

निंबूत येथील निंबाळकर कुटुंबास मुख्यमंत्र्यांचा मदतीचा हात

Published on

सोमेश्वरनगर, ता. २ : निंबूत (ता. बारामती) येथे बैलगाडा शर्यतीत बैलावरून वाद झाला. वादातून झालेल्या गोळीबारात रणजित निंबाळकर यांची हत्या झाली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी गौतम काकडे याच्यावर मोकांतर्गत कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तसेच त्यांची पत्नी अंकिता निंबाळकर यांना मंगळवारी (ता.२) मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाख रुपयांची आर्थिक मदत केली.

बैलगाडा मालक रणजित निंबाळकर यांचा सुंदर नावाचा बैल गौतम काकडे यांनी ५ लाख इसार देऊन घेतला होता. उरलेले ३२ लाख नेण्यासाठी गुरुवारी रात्री अकरा वाजता निंबाळकर अन्य सहकाऱ्यांसह काकडे यांच्या निवासस्थानी निंबूत (ता. बारामती) येथे आले होते. याप्रसंगी झालेल्या वादानंतर रणजित निंबाळकर यांच्यावर गौतमचे बंधू गौरव याने गोळी झडली. शनिवारी पहाटे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. बारामती न्यायालयाने गौतम काकडे व अन्य दोन आरोपींना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तर गौरव काकडे व त्यांचे वडील शहाजी काकडे यांची पोलिस कोठडी संपल्याने मंगळवारी बारामती न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. या हत्या प्रकरणाने संपूर्ण राज्यातील बैलगाडा क्षेत्रात खळबळ माजली होती. या घटनेची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व आरोपींवर मोकांतर्गत गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले.

दरम्यान, बैलगाडासह पोलिस भरती अकादमी चालविणाऱ्या रणजित निंबाळकर यांच्या मृत्यूने तेवीस वर्षीय पत्नी अंकिता आणि दहा महिन्यांची मुलगी अंकुरण पूर्णपणे निराधार झाले. उर्वरित कुटुंबाचा भवितव्याचा विचार करून त्यांना विशेष बाब म्हणून पाच लाख रुपयांची मदत शासनाच्या वतीने देण्याचा निर्णय मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला. मंगळवारी विधानभवनातील मुख्यमंत्री दालनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते निंबाळकर यांच्या पत्नीला मदतीचा हा धनादेश सुपूर्द केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.