

सोमेश्वरनगर, ता. १५ : ‘‘वैविध्यपूर्ण असणारा आणि जात, धर्म, पंथ, भाषा, भूगोल, वंश असे अनेक भेद असलेला भारत राज्यघटनेच्या बळावर एकसंध उभा आहे. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या दूरदृष्टीतला भारत राज्यघटनेने साकार केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जगभरातला अभ्यास करत अत्यंत आदर्श घटना देशाला दिली असून आपण ती कष्टपूर्वक जपली पाहिजे, असे मत ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. गणेश आळंदीकर यांनी व्यक्त केले.
सोमेश्वरनगर (ता. बारामती) येथील शरदचंद्र पवार इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या महाविद्यालयात डिप्लोमा शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी ‘राज्यघटनेचे महत्त्व’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन केले होते. यावेळी ॲड. यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एस.के. हजारे होते.
ॲड. आळंदीकर पुढे म्हणाले की, राज्यघटना हा विषय फक्त अभ्यासापुरता मर्यादित नसून तो रोजच्या जीवनात अनुभवण्याचा आणि पालन करण्याचा विषय आहे. प्रत्येकाने राज्यघटना समजून घेतली पाहिजे. राज्यघटनेचा गाभा उद्देशिकेमध्ये आहे. घटनेतील नियमांत वेळोवेळी दुरुस्ती झाली आहे. मात्र घटनेचा गाभा कुणीही बदलू शकत नाही.
दरम्यान, प्राचार्य हजारे यांनीही मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी प्रा. अमर घाडगे, प्रा. दिग्विजय चव्हाण, प्रा. शेखर गायकवाड, प्रा. खटके यांच्यासह १५० विद्यार्थी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.