निंबूतमधील शिबिराचा 
११० बालरुग्णांना लाभ

निंबूतमधील शिबिराचा ११० बालरुग्णांना लाभ

Published on

सोमेश्वरनगर, ता. १२ ः निंबूत (ता. बारामती) येथे सोमेश्वर कारखान्याचे माजी संचालक महेश काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त बालरुग्ण तपासणी, नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन केले होते. शिबिराचा ११० बालरुग्णांना लाभ झाला. तसेच, १४६ लोकांची नेत्रतपासणी करण्यात आली.
येथे शिबिराचे उद्‍घाटन पणन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष श्यामकाका काकडे, ज्येष्ठ नेते बी. जी. काकडे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, राजवर्धन शिंदे, प्रशांत सातव, आयर्नमॅन सतीश ननावरे, रमाकांत गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, विजय काकडे, उदय काकडे, लक्ष्मण गोफणे, शैलेश रासकर, राजेंद्र काकडे, सरपंच निर्मला काळे, शरद लकडे, संदीप बनसोडे आदी उपस्थित होते.
यावेळी लोणंद येथील शिवम बालरुग्णालयाच्या सहकार्याने परिसरातील बालरुग्णांची तपासणी केली आणि त्यानंतर मोफत औषधोपचार केले गेले. याप्रसंगी डॉ. अर्चना निकम यांच्यासह पाच डॉक्टरांनी ही तपासणी केली. दरम्यान, पुणे येथील बुधराणी हॉस्पिटलतर्फे डॉ. मंजूर शेख व डॉ. मिनाज शेख यांनी १४६ नागरिकांची नेत्रतपासणी केली. यापैकी महेश काकडे मित्रपरिवाराकडून मोफत ७५ चष्म्यांचे मोफत वाटप केले. यापैकी ३० लोकांना मोतिबिंदूचे निदान झाल्याने मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

04872

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com