शंभर खाटांच्या रुग्णालयास 
वाघळवाडीकरांकडून जागा प्रदान

शंभर खाटांच्या रुग्णालयास वाघळवाडीकरांकडून जागा प्रदान

Published on

सोमेश्‍वरनगर, ता. १७ : बारामतीतील पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न असे १०० खाटांचे रुग्णालय मंजूर झाले होते. मात्र जागेचा प्रश्‍न गंभीर होता. यावर वाघळवाडी ग्रामस्थांनी गायरान जागा देऊ केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नाने मंगळवारी (ता. १६) अखेर महसूल विभागाने ही जागा शासकीय महाविद्यालयास प्रदान करत असल्याचा आदेश काढला आहे. यामुळे रुग्णालय उभारणीचे रखडलेले काम आता सुरू होणार आहे.
सोमेश्‍वरनगर-नीरा या परिसरासाठी अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी बारामती शहरातील पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या अधिनस्त ७७ कोटी निधीचे १०० खाटांचे रुग्णालय मंजूर केले. त्यापैकी ६४ कोटी रुपयांच्या इमारत बांधकाम मंजुरीही नुकतीच मिळाली आहे. या रुग्णालयासाठी सोमेश्‍वर कारखान्यास जागा मागण्यात आली होती. मात्र कारखान्याकडे वा शिक्षण मंडळाकडे आता स्वतःसाठीच जागा अत्यंत अपुरी आहे. ऊस तोड मजूर कुठे उतरवायचे हा गंभीर प्रश्‍न आहे. या पार्श्‍वभूमीवर वाघळवाडीतील ग्रामस्थांनी रुग्णालय परत जाऊ द्यायचे नाही या निग्रहाने एकत्र येत दहा एकर गायरान जागा देण्याचा ठराव ग्रामसभेत एकमताने पारीत केला. तसेच सरपंच ॲड. हेमंत गायकवाड, उपसरपंच तुषार सकुंडे, ग्रामसेवक संजयकुमार भोसले, सतीश सकुंडे, विजय सावंत, ॲड. अनंत सकुंडे, अजिंक्य सावंत, गणेश जाधव, जितेंद्र सकुंडे, अनिल शिंदे, प्रभाकर कांबळे, विशाल हंगिरे, अजय सावंत हे शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटले. त्यानुसार पवार यांनी पुढील कार्यवाहीचे आदेश दिले. शासकीय महाविद्यालयाचे व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पथकाने पाहणी करून हिरवा कंदील महसूल विभागानेही आपली कार्यवाही पूर्ण करत मंगळवारी (ता. १६) दहा एकर जागा प्रदान करण्याचा शासन आदेश काढला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com