दिवाळीत साखरेचा दर राहणार स्थिर

दिवाळीत साखरेचा दर राहणार स्थिर

Published on

सोमेश्वरनगर, ता. २७ : केंद्र सरकारच्या अन्न मंत्रालयाने ऑक्टोबर महिन्यासाठी २४ लाख टन साखरेचा मासिक कोटा विक्रीसाठी निश्चित केला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सप्टेंबरच्या तुलनेत हा कोटा ०.५ लाख टनांनी जास्त आहे. मात्र, ऑक्टोबर २०२४ च्या तुलनेत हा कोटा दीड लाख टनांनी कमी आहे. या निर्णयाने साखरेचे दर स्थिर राहण्यास मदत होईल, असा जाणकारांचा अंदाज आहे.
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर साखरेचे दर वाढू नये याची काळजी घेत केंद्र सरकारने टप्प्याटप्प्याने साखरविक्रीचा मासिक कोटा वाढवत नेला. ऑगस्टमध्ये २२.५ लाख टन, सप्टेंबरमध्ये २३.५ लाख टन कोटा विक्रीसाठी दिला होता. दिवाळीसाठी किमान २५ लाख टनांचा कोटा असेल असा अंदाज होता. मात्र आगामी साखर हंगाम पावसामुळे लांबण्याची चिन्हे आहेत. अशात शिल्लक साखरसाठा ४५ लाख टनांच्या आसपासच असणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्राने संतुलन राखत २४ लाख टनांचा कोटा जाहीर केला असावा. ऑक्टोबर २०२३ च्या तुलनेत हा कोटा तब्बल पाच लाख टनांनी तर ऑक्टोबर २०२४ च्या तुलनेत दीड लाख टनांनी कमी आहे. त्यामुळे साखरेच्या बाजारात किरकोळ वाढ होऊ शकेल.

दरम्यान, ऑक्टोबर २०२३ ते सप्टेंबर २०२४ या साखर हंगामात २९१.५० लाख टन साखरविक्रीचा वार्षिक कोटा दिला गेला होता. या तुलनेत ऑक्टोबर २०२४ ते सप्टेंबर २०२५ या हंगामात २७५.५० लाख टन साखरविक्रीचा कोटा दिला गेला आहे.

केंद्र सरकारने शिल्लक साखर साठ्याचे गणित पाहून संतुलित कोटा दिला आहे. यामुळे साखरेचे दर ३८५० ते ३९०० रुपये प्रतिक्विंटल असणारे दर स्थिर राहतील. मागणी वाढलीच तर १५ ऑक्टोबरपर्यंत किरकोळ आणि तात्पुरती वाढ संभवते.
- राजेंद्र यादव, कार्यकारी संचालक, सोमेश्वर कारखाना

मागील तीन वर्षांतील मासिक साखरविक्री कोटा
ऑक्टोबर २०२३ - २९ लाख टन
ऑक्टोबर २०२४ - २५.५ लाख टन
ऑक्टोबर २०२५ - २४ लाख टन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com