‘सोमेश्‍वर’कडून आणखी
साडेतीन कोटी मिळवणार

‘सोमेश्‍वर’कडून आणखी साडेतीन कोटी मिळवणार

Published on

सोमेश्वरनगर, ता. ९ : सोमेश्वर कारखान्यास मागील चार हंगामात एफआरपीस विलंब केल्याने व्याज द्यावे लागले, ही अभिमानाची नव्हे तर लाजिरवाणी बाब आहे. ‘सोमेश्वर’ने राज्य सरकारच्या बेकायदेशीर परिपत्रकाप्रमाणे २ कोटी ३९ लाख व्याज देऊन दिशाभूल केली आहे. मात्र कृती समिती केंद्र सरकारच्या परिपत्रकानुसार शेतकऱ्यांना आणखी तीन ते साडेतीन कोटी रुपये व्याज मिळवून देणार आहे. त्यासाठी उच्च न्यायालयात दावा केला आहे, असे शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांनी सांगितले.
राज्य सरकारच्या एफआरपी धोरणानुसार ‘सोमेश्वर’ने २०२१-२२ ते २०२४-२०२५ या चार हंगामात दोन टप्प्यात एफआरपी दिली. ती देताना विलंब झाल्याने नुकतेच २ कोटी ३९ लाख रुपये व्याज शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले. असे व्याज देणारा राज्यातला पहिला कारखाना, अशी सभासदांची दिशाभूल अध्यक्षांनी केली. वास्तविक केंद्र सरकारच्या एफआरपी कायद्यानुसार चौदा दिवसांत एकरकमी एफआरपी देणे अन्यथा पंधरा टक्के व्याज देणे बंधनकारक आहे. कारखान्याने पळवाट शोधून काढून कमी व्याज दिले. म्हणूनच आम्ही केंद्र सरकारच्या धोरणानुसार अनुसरून उच्च न्यायालयात दाद मागितली असून, तीन-साडेतन कोटी अधिक मिळण्याची अपेक्षा आहे, असे सतीश काकडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
अध्यक्षांनी मागील चार हंगामात एफआरपीपेक्षा अनुक्रमे प्रतिटन २१८, ४९९, ६९७, २२६ रुपये प्रतिटन जास्त दिले, असे सांगितले, हीदेखील दिशाभूलच केली आहे. २०१३-१४ ते २०१५-१६ हे तीन हंगाम केवळ २२५७ रुपये प्रतिटन एवढाच दर दिला होता. शिल्लक साखरसाठ्याचे कमी मूल्यांकन करून प्रतिटन ५८३ रुपये कमी दिले होते, हे सभासद विसरणार नाहीत, असेही ते म्हणाले.

‘सोमेश्वर’ने ३५०० उचल द्यावी
‘सोमेश्वर’ने पहिली उचल केवळ प्रतिटन ३,३०० रुपये देऊन टिमकी वाजविली आहे. वास्तविक शेजारच्या ‘दत्त इंडिया’ या खासगीने आणि ‘माळेगाव’नेही तेवढीच उचल दिली आहे. तर सांगली, कोल्हापूरमध्ये ३५०० ते ३६०० रुपये उचली आहेत. शेजारच्या अडचणीतल्या छत्रपती व इंदापूर कारखान्याने ३२०० रुपये उचल दिली आहे. सोमेश्वरने ३५०० रुपये उचल द्यावी, अशी मागणी काकडे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com