गाळपासाठी कारखान्यांचा अधिकाधिक आटापिटा

गाळपासाठी कारखान्यांचा अधिकाधिक आटापिटा

Published on

सोमेश्वरनगर, ता. २३ : पुणे जिल्ह्याचा गाळप हंगाम अत्यंत वेगाने सुरू असून, अधिकाधिक गाळपासाठी कारखाने आटापिटा करत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात ५३ लाख ५७ हजार टन उसाचे गाळप झाले आहे. ४६ लाख ३४ हजार क्विंटल साखरनिर्मिती झाली आहे. गतहंगामापेक्षा साखर उतारा अर्ध्या टक्क्यांनी अधिक आहे. उताऱ्यात ‘सोमेश्वर’ने अन्य कारखान्यांना खूप मागे टाकले आहे. तर गाळपात अवघ्या पन्नास दिवसात ‘बारामती अॅग्रो’ने तब्बल १० लाख टनांचा तर ‘दौंड शुगर’ने नऊ लाख टनांचा टप्पा ओलांडला आहे.


पुणे जिल्ह्यातील अठरापैकी ‘घोडगंगा’, ‘राजगड’ आणि ‘यशवंत’ हे तीन कारखाने बंद आहेत. ओंकार ग्रुपने ‘कर्मयोगी’ सहयोगी तत्त्वावर तर ‘अनुराज’ची मालकी हक्काने चालवण्यास घेतला आहे. त्यांची आकडेवारी मिळू शकली नाही. उर्वरित तेरा कारखान्यांनी २१ नोव्हेंबरपर्यंत ५३ लाख ५७ हजार ६४७ टनांचे गाळप केले आहे. सरासरी साखर उतारा ८.६५ टक्के इतका आहे. गतहंगामात तो याच दिवसात ८.१६ टक्के इतका होता. जिल्ह्यातील आठ सहकारी कारखान्यांचा उतारा तब्बल ९.८९ टक्के इतका समाधानकारक आहे. तर पाच खासगी कारखान्यांचा ७.४७ टक्के इतका आहे.

तीन कारखाने बंद असले तरीही ऊस कमीच पडत आहे. सभासदांचा व नोंद केलेला ऊस गाळप करतानाच अन्य कार्यक्षेत्रातला गेटकेन आणण्यासाठी कारखान्यांमध्ये अहमहमिका चालली आहे. विशेषतः दौंड तालुक्यातील उसाच्या आगारावर सगळे तुटून पडल्याचे दिसून येत आहे. गाळपात बारामती अॅग्रोने १० लाख टनांचा तर दौंड शुगरने ९ लाख टनांचा टप्पा ओलांडला आहे. ५ खासगी कारखान्यांनी ८ सहकारी कारखान्यांपेक्षा अधिकचे गाळप केले आहे. साखरनिर्मिती आणि साखर उताऱ्यात मात्र सहकारी कारखाने खूप पुढे आहेत.

सहकारी कारखान्यांचे उतारे समाधानकारक
साखर उताऱ्यावर उसाची एफआरपी ठरत असल्याने त्याकडे शेतकऱ्यांचे अधिक लक्ष असते. चालू हंगामात ‘सोमेश्वर’ने सर्वच कारखान्यांना खूपच मागे टाकले आहे. याशिवाय माळेगाव, विघ्नहर, छत्रपती व भीमाशंकर या सहकारी कारखान्यांचे उतारे अत्यंत समाधानकारक आहेत. ज्यूसपासून किंवा बी हेवी पद्धतीने इथेनॉलनिर्मिती करणाऱ्या कारखान्यांचा प्रत्यक्ष अंतिम उतारा हंगामानंतरच समजणार आहे.

कारखाने संख्या........गाळप (टन)........साखर(क्विं.) ........उतारा (टक्के)
सहकारी........८........२६१३६४५........२५८४०८०........९.८९
खासगी........ ५........२७४४००२........२०५०२६८........७.४७


(साखर आयुक्तालयाच्या २१ नोव्हेंबरच्या अहवालानुसार)
कारखाना........गाळप(टन)........साखर(क्विं.)........उतारा (टक्के)
सोमेश्वर........४६७२९५........५१०१५०........१०.९८
माळेगाव........४१३८४५........४२९४००........१०.५४
विघ्नहर........३५७४५०........३५००००........१०.३३
छत्रपती........ ३६८१६५........३८५४००........१०.३१
भीमाशंकर........३९५८१०........३९०५००........१०.०८
संत तुकाराम........१४७०१०........ १३९१५०........९.४३
पराग अॅग्रो........२५७८१२ ........२३५६३८........८.७४
भीमा पाटस........१७०२१०........१४८८५०........८.३९
दौंड शुगर........९०४१८०........६७७०५०........७.६१
बारामती अॅग्रो........१०८२९२५........८१९१००........७.५८
व्यंकटेश कृपा........२५९५६५........१६७२९०........६.४१
श्रीनाथ........२३९५२०........१५११९०........६.२६
नीरा-भीमा........२९३८६० २३०६३०........-

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com