‘शरदचंद्र’च्या प्राध्यापकांना कार्यशाळेतून ‘एआय’चे धडे
सोमेश्वरनगर, ता. २७ ः येथील शरदचंद्र पवार इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (डिप्लोमा) या महाविद्यालयाच्या वतीने ‘नेक्स्ट जनरेशन अॅप्लिकेशन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ या विषयावर सहा दिवसीय ऑनलाईन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये २३ राज्यातील ९८८ प्राध्यापक व अभ्यासकांनी सहभाग नोंदवत देशातील विविध क्षेत्रात एआयच्या भूमिकेबाबत चर्चा केली.
प्रशिक्षण व तंत्र शिक्षण संचलनालयाच्या (एआयसीटी) सुचनेनुसार महाविद्यालयाच्या फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम अंतर्गत ‘एआय’ संदर्भातील ऑनलाईन कार्यशाळा १९ ते २४ जानेवारी या कालावधीत पार पडली. कार्यशाळेचे उद्घाटन सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप यांनी केले. या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष मिलिंद कांबळे, संचालक प्रतिनिधी आनंदकुमार होळकर, सचिव भारत खोमणे उपस्थित होते. कार्यशाळेत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी आणि अनुभवी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
सुमागो इन्फोटेकच्या पायल पाटील यांनी ‘एआय आणि मशीन लर्निंग’ तसेच ‘नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग’ या विषयांची ओळख करून दिली तर रसिका जगताप यांनी ‘डीप लर्निंग’ या आधुनिक तंत्रावर प्रकाश टाकला. प्रोअझ्यूर सॉफ्टवेअर सोलुशनच्या बापू अर्कास यांनी स्वायत्त यंत्रणा आणि रोबोटिक्स मधील एआयचा वापर स्पष्ट केला. अवातर सिस्टमच्या रणजित शिंदे यांनी एक्सेल ऑटोमेशन आणि आरपीए यांबाबत मार्गदर्शन केले. साखराळे महाविद्यालयाच्या डॉ. एस. यू. माने यांनी ‘जनरेटिव्ह एआय’, डॉ. सुजील ए. यांनी ‘मायक्रो ग्रिड सिस्टीम’ आणि डॉ. आर. एम. शिंदे यांनी ‘वाहनांमधील एआयचे भविष्य’ या विषयांवर सविस्तर चर्चा केली. कराडच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डॉ. संदीप थोरात यांनी, एआयमधील नवीन संशोधनाबाबत माहिती दिली. तर पुण्याच्या एआयएसएसएमच्या डॉ. रियाज अहमद जमादार यांनी वित्तीय व शैक्षणिक क्षेत्रातील एआयच्या क्रांतीबद्दल उहापोह केला. प्राचार्य सोमनाथ हजारे, प्रा. ज्योती खरात, प्रा. राहुल कदम यांनी संयोजन केले.
अमेरिकेतील तज्ज्ञ आणि प्राध्यापकांकडूनही भविष्यवेध
अमेरिकेतील ओहीयो येथून नितीन कारंडे यांनी हॉस्पिटॅलिटी उद्योगातील एआयच्या वापराबाबत आढावा घेतला. तर, अमेरिकेतीलच ओरेकल इनकार्पोरेशनचे सुधांशू पत्की यांनी ''सस्टेनेबल इंजिनिअरिंगमधील एआय या विषयाचे महत्त्व सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

