निंबूत येथे आठवणींना उजाळा

निंबूत येथे आठवणींना उजाळा

Published on

सोमेश्वरनगर, ता. ५ ः ‘‘शेवटच्या क्षणीसुद्धा कामाचे कागद सोबत घेऊन जाणारा आणि सर्व जाती- धर्मास समानतेने पाहणारा अजितदादांसारखा कामाचा माणूस नेता म्हणून आपल्याला मिळाला हे भाग्यच. कार्यकर्त्यांनीही त्यांच्यासारखे सतत शिकत राहणे, जनतेसाठी काम करणे याचा ध्यास घेतला पाहिजे. अजितदादांचे पुरोगामी विचार पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा भावना सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे यांनी मांडल्या.’’
निंबूत (ता. बारामती) येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी शोकसभेचे आयोजन केले होते. यावेळी काकडे बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रमोद काकडे, लक्ष्मण गोफणे, नीलेश शिंदे, विलास फरांदे, हिंदुराव काकडे, अविराज काकडे उपस्थित होते.
याप्रसंगी सोमेश्वर कारखान्याचे माजी संचालक महेश काकडे म्हणाले, ‘‘दादांनी माझ्यासारख्या असंख्य सामान्य माणसांना ओळख दिली. विकासाचे राजकारण त्यांनी शिकविले.’’
शेतकरी कृती समितीचे सरचिटणीस मदन काकडे म्हणाले, ‘‘अजितदादा नुसते लोकशाही मानणारे नव्हे, तर स्वतः तसे वागणारे होते. समोरच्याचा विरोधी विचार मान्य करण्याचे हरवत चाललेले तत्त्वे ते पाळत.’’

कार्यकर्त्यांची सोबतीची इच्छा
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र जगताप म्हणाले, ‘‘पवारसाहेबांच्या मुशीत तयार झालेल्या अजितदादांनी राज्यात सहकार, शेती अशा क्षेत्राना दिशा दिली. त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करूनच निवडणुका लढविण्याचे ठरविले होते. आताच नव्हे भविष्यातही सोबत राहून चांगले काम करणे ही दादांना श्रद्धांजली ठरेल.’’

अजितदादांनी सर्वांना पवारसाहेबांचा फोटो घेऊन काम करायचे आदेश दिले होते. सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची दृष्टी होती. ते असते तर कदाचित विलीनीकरण लवकर झाले असते. त्यांचे काम पुढे चालवूया.
- करण खलाटे, माजी सभापती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com