
शेटफळगडे केंद्रावर कॉपीमुक्त अभियान
शेटफळगढे, ता. ४ : येथील श्री नागेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज शेटफळगढे विद्यालयात दहावीची परीक्षा सुरू असून परीक्षा केंद्रावर कॉपी मुक्त अभियान राबविले जात असल्याची माहिती केंद्र संचालक बी.आर..भिसे यांनी दिली.
विद्यालयात पारवडी, शिर्सुफळ, लाकडी, निंबोडी, शेटफळगढे या विद्यालयातील मराठी माध्यमाचे ३४७ व इंग्रजी माध्यमाचे ३५ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. परीक्षा केंद्रावर कॉपीमुक्त अभियानाची कडक अंमलबजावणी केलेली आहे. राज्यमंडळ पुणे यांनी विद्यालयात बैठे पथक नेमले असून विद्यालयातील सर्व शिक्षक पुणे एस. एस. सी. बोर्डाच्या सर्व नियमांची अंमलबजावणी करीत आहेत. पोलिस बंदोबस्तही चोख ठेवला आहे. केंद्रप्रमुख बाळकृष्ण खरात यांनी परिक्षा केंद्राला भेट देऊन केंद्रांवर सर्व सुविधा असल्याचा अभिप्राय दिला व कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. परीक्षा केंद्रावर ''कॉपीमुक्त अभियान'' राबवले असल्याने स्कूल कमिटी सदस्य, ग्रामस्थ व पालकांनी समाधान व्यक्त केले.