निरगुडेत वीज उपकेंद्रास ६० गुंठे जागा मंजूर

निरगुडेत वीज उपकेंद्रास ६० गुंठे जागा मंजूर

शेटफळगढे, ता.१ : निरगुडे (ता. इंदापूर) येथे महावितरण कंपनीचे प्रस्तावित वीज उपकेंद्रास अखेर ६० गुंठे जागा मंजूर झाली आहे. याबाबतच्या प्रस्तावास जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी नुकतीच मंजुरी दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आंनदाचे वातावरण आहे.
शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी असूनही केवळ पूर्ण क्षमतेने वीज मिळत नसल्याने शेतीच्या विजेचा प्रश्न गंभीर बनला होता. त्यामुळे निरगुडे येथे नवीन विद्युत उपकेंद्र व्हावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत होती. याबाबत सकाळमध्ये विजेच्या कमी दाबामुळे येणाऱ्या समस्या व त्यामुळे होणारे शेतकऱ्यांचे नुकसान याविषयी बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. दरम्यान, जागेच्या प्रस्तावास जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता मिळणे गरजेचेबाबतही बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. याची दखल घेऊन प्रशासनाने व राजकीय पदाधिकाऱ्यांनी लक्ष दिल्याने या जागेचा प्रश्‍न मार्गी लागला. उपकेंद्राच्या जागेसाठी ग्रामपंचायतीने दोन एकर जागा देण्याचे मान्य केले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेसाठी प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र, केवळ जागे अभावी वीज उपकेंद्राचे काम होत नव्हते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून विजेचा सततचा लपंडावामुळे शेतकरी त्रस्त झाले होते. त्यावर महावितरणचे अधिकारी व शेतकरी यांच्यात चर्चा झाल्यावर या भागातील विजेचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी वीज उपकेंद्र हे एकमेव पर्याय असल्याने याची जागा लवकर मिळण्यासाठी प्रयत्न करावे असे अधिकाऱ्यांनी या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गाव भेटी दरम्यान सुचवले होते. त्यावर शेतकऱ्यांनीही आपापल्या परीने विरोधी पक्ष नेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री दत्तात्रेय भरणे व हर्षवर्धन पाटील यांच्याकडे मागणी व पाठपुरावा केला होता. त्याचबरोबर इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती हनुमंतराव वाबळे यांनी स्वतः जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन या प्रस्तावाचा पाठपुरावा केला होता.
या सर्वांच्या प्रयत्नांना अखेर यश आले व २९ मे रोजी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी निरगुडे वीज उपकेंद्रासाठी ६० गुंठे जागा देण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली. यामुळे आता महावितरणने लवकरात लवकर या उपकेंद्राच्या कामास सुरुवात करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत .
-----------------------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com