इंदापूर तालुक्यातील १३ गावात कोतवाल भरती सुरू

इंदापूर तालुक्यातील १३ गावात कोतवाल भरती सुरू

शेटफळगढे, ता २५ : इंदापूर तालुक्यातील १३ गावच्या कोतवाल भरतीचे अर्ज स्वीकारण्यास मंगळवारपासून (ता. २६) पासून सुरुवात झाली आहे. या संदर्भाचा जाहीरनामा तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी जाहीर केला आहे.
उमेदवारांना १० ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत. अर्जाची छाननी १२ ऑक्टोबरला तर, लेखी परीक्षा १५ ऑक्टोबरला होणार असून अंतिम निवड १८ ऑक्टोबरला प्रसिद्ध केली जाणार आहे.
१८ ते ४० वयोगटातील चौथी पास उमेदवारांना अर्ज करता येणार असून त्या सजामधील रहिवासी असणे आवश्यक आहे.
आरक्षणामध्ये निरगुडे-इतर मागास वर्ग, भिगवण - अनुसूचित जमाती, शेळगाव - भटक्या जमाती ब, हिंगणगाव - भटक्या जमाती क, वरकुटे बुद्रुक- भटक्या जमाती ड, कुरवली - विशेष मागास प्रवर्ग, निंबोडी व तक्रारवाडी - इतर मागास वर्ग महिला, खोरोची व व्याहळी - इतर मागास वर्ग, काझड - आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्ग महिला , निर निमगाव- मागास प्रवर्ग व रेडा - खुला प्रवर्ग
यांचा समावेश आहे.

आवश्यक
-कार्यालयाने ठरवून दिलेल्या विहित नमुन्यातील अर्ज २६ सप्टेंबरपासून १० ऑक्टोबरपर्यंत ५० रुपये शुल्क भरून द्यावा.
-अर्जासोबत लहान कुटुंब असल्याबाबतचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे
- कोतवालाचा वारसदार असल्यास तहसीलदार इंदापूर यांच्याकडील कागदपत्र जोडणे आवश्यक
-शैक्षणिक पात्रतेच्या प्रमाणपत्राच्या छायांकित प्रती, जातीच्या प्रमाणपत्राची व वैद्यता प्रमाणपत्राची छायांकित प्रती, संबंधित सजात राहत असल्याचा तलाठी अथवा ग्रामसेवकाचा रहिवासी दाखला, आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, यापैकी एक ओळखीसाठी पुरावा जोडावा लागणार आहे

परीक्षा शुल्क
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ५०० रुपये, इतर प्रवर्गातील उमेदवारांना ३०० रुपये प्रमाणे तहसीलदार इंदापूर यांच्या नावे डीडी काढावा लागणार आहे.

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com