निरगुडे प्राथमिक शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

निरगुडे प्राथमिक शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

Published on

शेटफळगढे, ता. १० : निरगुडे (ता. इंदापूर) येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तुंग यश मिळविले आहे. धीरज भागवत वाकडे, प्रतीक वसंत कोकरे हे विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत आले तर, स्वराली सतीश राऊत, ओंकार प्रकाश वाकडे, समर्थ अमोल वाकडे, आरुषी राहुल ननवरे, अभय नितीन दळवी, स्नेहा महादेव राऊत, रोनित राहुल कदम, कृष्णा ज्ञानेश्वर काजळे, यश बापू गायकवाड हे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरले आहेत.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका रत्नमाला सरगुले यांनी मार्गदर्शन केले. केंद्रप्रमुख नानासाहेब दराडे, मुख्याध्यापक औदुंबर दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा सराव करून घेतला. यावेळी शोभा होळकर, बालाजी मादळे, संजय वणवे, पुष्पा शेलार, संजय भुसे, सतीश राऊत यांचे सहकार्य लाभले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.