नुकसान एकरात भरपाई गुंठ्यांत

नुकसान एकरात भरपाई गुंठ्यांत

Published on

शेटफळगढे, ता ४ : काझड परिसरात पाच महिन्यांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने एकरात पिकांचे नुकसान झाले आणि भरपाई मात्र गुंठ्यांच्या हिशेबात शासन देत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करत असल्याचा आरोप करत काझडच्या (ता. इंदापूर) ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

काझड येथील शेतकऱ्यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते अण्णा पाटील, सागर नरुटे, राजकुमार पाटील, अमोल नरुटे, योगेश काळे, पांडुरंग नरुटे यांनी नायब तहसीलदार विजय घुगे यांच्याकडे तसे निवेदन दिले आहे.
याबाबत पाटील म्हणाले की, मे महिन्यात झालेल्या पावसाने काझड परिसरातील कांदा, मका, बाजरी, भुईमूग आदी पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले होते. शेतकऱ्यांच्या जमिनीतील माती वाहून गेली होती. अनेकांच्या विहिरीत माती जाऊन त्या भुईसपाट झाल्या होत्या. त्यावेळी तसे पंचनामे देखील करण्यात आले
शेतकऱ्यांचे नुकसान एकरांमध्ये झालेले असताना ते केवळ काही गुंठ्यांत झाल्याचे दाखवून नुकसानभरपाई देण्यात येत असल्याचा दावा पाटील यांनी केला. काझडसह इंदापूर तालुक्यातील पश्चिम भागातील शेतकऱ्यांच्या मनात तीव्र संतापाची भावना आहे. त्या भावनेची दखल घेऊन शासनाने नुकसानभरपाईच्या धोरणात योग्य बदल करावा. अन्यथा शेतकरी आक्रमक आंदोलन करतील, असा इशारा पाटील यांनी दिला.

दरम्यान, नुकसान झालेल्या शेताची दुरुस्ती करण्यासाठी लाखो रुपये खर्च करावा लागत असताना केवळ मदत दिल्याचा गवगवा करून तुटपुंजी मदत करण्याचे काम होत आहे त्यामुळे असली मदत करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम शासनाने थांबवावे व शेतकऱ्यांना भरीव मदत करण्याचे काम करावे, अशी मागणी देखील ग्रामस्थांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com