बंडोबांना थंड करताना नाकीनऊ येणार

बंडोबांना थंड करताना नाकीनऊ येणार

Published on

सोमाटणे- चांदखेड गट

बंडोबांना थंड करताना नाकीनऊ

सोमाटणे - चांदखेड या गटाचे एक विशेष म्हणजे इच्छुक उमेदवार स्वतःची उमेदवारी पक्की समजत आहेत आणि खासगीत विचारले असता पक्षाने तिकीट नाही दिले; तर अपक्ष लढू पण निवडणूक लढवूच. मग, ऐनवेळी पक्ष कोणता का असेना. त्यामुळे तिकीट मिळवणाऱ्या उमेदवाराला मते मागण्या पूर्वी बंडोबांना थंड करताना नाकी नऊ येणार हे नक्की.
- बी.आर.पाटील
------------
मावळ तालुक्याचे द्वार म्हणून सोमाटणे गावाची ओळख आहे. तालुक्याच्या पाचही जिल्हा परिषद गटांमध्ये सर्वात जास्त चर्चेत असणारा गट म्हणजे सोमाटणे - चांदखेड गट आहे. यावर्षी प्रथमच पुर्नस्थापित झालेल्या गटांमध्ये हा गट आहे. त्यामध्ये सोमाटणे आणि चांदखेड हे पंचायत समितीचे दोन गण आहेत. सोमाटणे - चांदखेड हा गट सर्वसाधारण पुरुषाला आरक्षित होईल, या अपेक्षेने वारेमाप पैसे खर्च करणाऱ्या अनेक इच्छुकांच्या पदरी निराशा पडली आहे. जिल्हा परिषद सदस्यपदाची स्वप्ने पडू लागल्याने काही इच्छुकांनी पत्नीला रिंगणात उतरवल्याचे दिसत आहे. सध्या आमदार सुनील शेळके हे या गटात जातीने लक्ष घालून आहेत जर त्यांनी दिलेला उमेदवार उत्तम कारभारी ठरला; तर कामे करण्यात हातखंडा असलेले शेळके या गटातही त्याच पद्धतीने काम करतील का ? हेही पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या गटात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप हे दोन पक्ष सोडले; तर कुणीही प्रबळ नाही, असे चित्र सध्यातरी दिसते आहे. आता घोडा मैदान अगदी काही दिवसांवर आहे. येणारी परिस्थिती ठरवेल, कुणाचे तिकीट कापले आणि कुणाला संधी मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com