पुणे
सुप्यात जिवाजी महाले यांना अभिवादन
सुपे, ता. १० : सुपे (ता. बारामती) येथे शूरवीर जिवाजी महाले यांची जयंती साजरी करण्यात आली. येथील संत सेना महाराज मंदिरामध्ये हा कार्यक्रम झाला. नाभिक संघटनेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संघटनेचे पदाधिकारी सुयश जाधव यांच्या हस्ते जिवाजी महाले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. दरम्यान, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिपक जाधव यांनी महाले यांच्या जीवनपटाविषयी माहिती दिली. यावेळी मंदिरात सार्वजनिक महाआरतीचा कार्यक्रम झाला. या प्रसंगी संघटना, सेना महाराज सोसायटीचे पदाधिकारी व महिला उपस्थित होत्या.