सुप्यात गीता पाठशाळेचा प्रारंभ
सुपे, ता. ७ : सुपे (ता. बारामती) गावच्या मुख्य बाजार पेठेतून रविवारी (ता. ६) सकाळी शांती यात्रा काढण्यात आली. दरम्यान, येथे गीता पाठशाळेचा प्रारंभ करण्यात आला. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्यावतीने ही शांती यात्रा काढण्यात आली. बसस्थानक परिसरात सरपंच तुषार हिरवे यांनी स्वागत केले. यावेळी करुणादीदी भोसरी, अर्चनादीदी शिरूर, सरपंच हिरवे, संतोषभाई कोंडे यांनी मनोगत व्यक्त केले. सुपे बसस्थानकापासून निघालेल्या या शांती यात्रेचा समारोपाचा कार्यक्रम स्वयंभू श्रीसिद्धेश्वर महादेव मंदिरात झाला. दरम्यान, येथे करूणादीदी यांच्या हस्ते गीता पाठशाळेचा प्रारंभ केला.
याप्रसंगी सरपंच तुषार हिरवे, श्रीसिद्धेश्वर महादेव देवस्थानचे मुख्य विश्वस्त प्रकाश चांदगुडे, सचिव अशोक बसाळे, संतोष कोंडे, जिल्ह्यातील विश्व विद्यालयाच्या विविध केंद्रातील बहेनजी व साधक उपस्थित होते. राजयोग, ध्यान, नामस्मरण यासाठी सुप्यातही विश्व विद्यालयाचे केंद्र सुरू करण्याच्या मागणीला करूणादीदींनी हिरवा कंदील दाखवला. ग्रामस्थ व देवस्थानच्यावतीने करूणादीदींचा शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प देऊन सत्कार केला.

