रांजणगाव देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाची नियुक्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रांजणगाव देवस्थान ट्रस्टच्या 
विश्वस्त मंडळाची नियुक्ती
रांजणगाव देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाची नियुक्ती

रांजणगाव देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाची नियुक्ती

sakal_logo
By

शिरूर, ता. १३ : अष्टविनायकांपैकी एक असलेल्या ‘श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट’च्या नवीन विश्वस्त मंडळाची निवड प्रक्रिया जाहीर झाली असून, पुणे सत्र न्यायालयाने मुलाखतींद्वारे पाच विश्वस्त नव्याने नियुक्त केले आहेत.
कोरोना काळात जुन्या विश्वस्त मंडळाची मुदत संपली होती. परंतु, त्या कालावधीत निवड प्रक्रिया न झाल्याने जुन्या विश्वस्तांना मोठी मुदतवाढ मिळाली होती. त्यामुळे नव्याने नियुक्तीसाठी मोठी स्पर्धा निर्माण झाली होती व त्यासाठी अनेकजण इच्छुक होते. श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांची मुलाखतीद्वारे नियुक्ती सत्र न्यायालयामार्फत केली जाते. देव घराण्यातील दोन प्रतिनिधी, दोन स्थानिक व एक जिल्हा परिसरातील, असे पाच प्रतिनिधी विश्वस्त मंडळावर घेतले जातात. रांजणगाव देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तपदासाठी यावेळी अनेकजण इच्छुक असल्याने मोठी स्पर्धा निर्माण झाली होती. जिल्हा सत्र न्यायालयाने मुलाखतींसाठी तीन न्यायाधीशांचे पॅनेल तयार केले होते. त्यामार्फत तब्बल ३९५ इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यामधून गुरुवारी (ता. १२) नवीन विश्वस्तांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. त्यानुसार, देव घराण्यातील ओमकार नितीन देव व विजय काशिनाथ देव यांची; तर स्थानिक प्रतिनिधी म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्या स्वाती दत्तात्रेय पाचुंदकर व उद्योजक तुषार बाळासाहेब पाचुंदकर आणि जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून कन्हेरसर (ता. खेड) येथील संदीप तुकाराम दौंडकर यांची विश्वस्त मंडळावर नियुक्ती केली. या नूतन विश्वस्त मंडळाचा कार्यकाळ पुढील पाच वर्षांसाठी आहे.
देवस्थानच्या कार्यालयात नवीन विश्वस्त मंडळाने पदभार स्वीकारला. त्यावेळी रांजणगाव आणि परिसरातील विविध संस्था-संघटनांच्या प्रतिनिधींनी त्यांचे अभिनंदन केले.