शरदवाडीत जागेच्या वादातून भावाच्या कुटुंबाला मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शरदवाडीत जागेच्या वादातून
भावाच्या कुटुंबाला मारहाण
शरदवाडीत जागेच्या वादातून भावाच्या कुटुंबाला मारहाण

शरदवाडीत जागेच्या वादातून भावाच्या कुटुंबाला मारहाण

sakal_logo
By

शिरूर, ता. १९ : शरदवाडी (ता. शिरूर) येथे शेतीच्या बांधाच्या व घराच्या जागेच्या वादातून एका शेतकऱ्यासह त्याच्या कुटुंबीयांना त्याच्याच दोघा भावांनी व मुलांनी बेदम मारहाण केली. या मारामारीत कुऱ्हाड, कोयता, खोरे व गजाचा वापर झाला. त्यात चारजण जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार चालू आहेत.
या मारहाणीत राहुल बाळू थोरात (वय ३२), त्याची पत्नी वैशाली (वय २८), वडील बाळू निवृत्ती थोरात (६२) व आई कमल बाळू थोरात (वय ५५, सर्व रा. शरदवाडी) हे जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार चालू आहेत. राहुल थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलिसांनी शहाजी थोरात, अमोल थोरात, नितीन थोरात, दिलीप थोरात, गणेश थोरात (सर्व रा. शरदवाडी) यांना अटक केली. न्यायालयीन कोठडी मिळाल्याने या सर्वांची येरवडा कारागृहात रवानगी केल्याची माहिती या प्रकरणाचा तपास करणारे पोलिस उपनिरीक्षक सुनील उगले यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थोरात कुटुंबात शेतजमिनीचा व घराच्या जागेचा वाद आहे. त्यातूनच बाळू थोरात यांच्यावर व त्यांच्या कुटुंबीयांवर त्यांचेच भाऊ शहाजी थोरात व दिलीप थोरात यांनी अमोल, नितीन व गणेश या मुलांसह हल्ला केला. गणेश थोरात याने उलटी कुऱ्हाड बाळू थोरात यांच्या डोक्यात घालण्याचा प्रयत्न केला. त्यांनी हाताने हा वार अडविल्याने त्यांचा हात फ्रॅक्चर झाला. दिलीप यानेही बाळू यांना कोयत्याने मांडीवर निसरडा वार केला. शहाजी याने खोऱ्याने पायावर मारहाण केली. फिर्यादी राहुल हे आई व पत्नीसह वडीलांना वाचविण्यासाठी गेले असता त्यांनाही गज, लाकडी दांडक्याने मारहाण केली.