महागणपतीला आंब्यांचा महानैवेद्य

महागणपतीला आंब्यांचा महानैवेद्य

शिरूर, ता. २२ : साडेतीन मुहूर्तापैकी एक महत्त्वाचा शुभयोग समजल्या जाणाऱ्या अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधत अनेकांनी आज महागणपती चरणी हजेरी लावत दर्शन घेतले. जोडून सुट्या आल्याने महागणपती मंदिरात दर्शनासाठी भाविकांची सकाळपासूनच मोठी गर्दी होती.
अक्षय्य तृतीयेचे औचित्य साधून महागणपती मंदिरात विविध धार्मिक विधींचे आयोजन केले होते. महागणपतीचा गाभारा आंब्यांच्या पानांची तोरणे व रंगीबेरंगी फुलांनी सजविला होता. दुपारी महापूजेनंतर पाच हजार एक आंब्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला. पुण्यातील गणेश भक्त किरण मेनकर व बाळकृष्ण जांभळे यांनी हे आंबे महागणपती चरणी अर्पण केले.
आज उन्हाचा तडाखा अधिक असल्याने भाविकांचे उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी दर्शन रांगेवर मंडप उभारला होता. तसेच दर्शन रांगेतच भाविकांना पिण्याच्या पाण्याची सोय केली होती, अशी माहिती श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा स्वाती पाचुंदकर यांनी दिली. सायंकाळच्या आरतीनंतर महागणपती चरणी अर्पण केलेले आंबे भाविकांना प्रसाद म्हणून वाटण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com